शिवसेना मनसेला पाठिंबा देणार?

नाशिकमध्ये महापौरपदासाठी शिवसेना मनसेला पाठिंबा द्यायची शक्यता आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता आहे. एकीकडे महापौरपदासाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु असताना भाजपही त्यासाठी प्रयत्न करत आहे.

Updated: Mar 14, 2012, 04:12 PM IST

दीपक भातुसे, www.24taas.com, नाशिक

नाशिकमध्ये महापौरपदासाठी शिवसेना मनसेला पाठिंबा द्यायची शक्यता आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता आहे. एकीकडे महापौरपदासाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु असताना भाजपही त्यासाठी प्रयत्न करत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. या भेटीत नाशिकबाबत बोलणं झाल्याचं सांगण्यात येतंय. नाशिकमध्ये एकूण १२२ सदस्य आहेत. शिवसेना तटस्थ राहीली तरी मनसे आणि भाजपला मिळून बहुमतासाठी आवश्यक मते मिळवून महापौर बसवू शकतात.

त्यामुळं अपक्षांची मनधरणी करण्याचा प्रश्नच येणार नाही असं मानलं जातंय. त्यामुळं काँग्रेस आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असून भेटीगाठींना वेग आलाय. नाशिकच्या महापौरपदासाठी उद्या निवडणूक होतेय.