www.24taas.com, पुणे
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर येणार आहेत. दुपारी चार वाजता ते पुण्यात दाखल होणार आहेत. पुणे स्फोटानंतर शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत.
टिळक पुरस्कारांचं वितरण करण्यासाठी शिंदे पुण्यात येणार होते. त्याच दिवशी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या 4 स्फोटांनी पुणं हादरलं होतं. गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारावयाचा असल्याने शिंदेंचा तो नियोजित दौरा रद्द झाला होता. पुणे स्फोटात पोलिसांच्या हाती अजूनही फारसे धागेदोरे आलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा आजचा दौरा महत्वपूर्ण मानण्यात येतोय.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही आज पुणे दौ-यावर आहेत. स्फोटासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची वरिष्ठ पोलीस अधिका-यांबरोबर बैठक होणार आहे.