कोल्हापुरात मनसेचा मोर्चा

जागतिक वारसा स्थळात समावेश असणा-या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात उत्खनन होतंय. हे उत्खनन त्वरित थांबवावं या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Updated: Aug 9, 2012, 07:28 AM IST

www.24taas.com, कोल्हापूर

जागतिक वारसा स्थळात समावेश असणा-या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात उत्खनन होतंय. हे उत्खनन त्वरित थांबवावं या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

जैवविविधतेनं समृद्ध असणा-या भागात मानवी हस्तक्षेप वाढलाय. त्यामुळं तो तत्काळ बंद करावा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलीय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन सुरु आहे. यालाही तत्काळ आळा घालावा असंही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय. या मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.