तुकोबांच्या पालखीचा मुक्काम सरकारवाड्यात

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आस या वारक-यांमध्ये दिसतेय.. मंदिराच्या परिसरात पालखी दाखल झाली असून, मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम सरकारवाड्यात असणार आहे..

Updated: Jun 10, 2012, 11:03 PM IST

www.24taas.com, देहू

 

आषाढी वारीसाठी तुकोबांच्या पालखीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळं देहूनगरी सध्या वारकऱ्यांनी फुलुन गेली आहे. आज पालखी पंढरपुरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. तुकोबांच्या पालखीचा  पहिला मुक्काम सरकारवाड्यात  आहे.

 

विठूनामाचा गजर करत अवघ्या महाराष्ट्राला भगवंत भेटीची ओढ लावणारा सोहळा म्हणजे आषाढी वारी.... देहूत आज सकाळपासूनच हजारो वैष्णवांची मांदिआळी देहू नगरीत जमा झाली होती. लाखो वारक-यांच्या उत्साहात आणि ग्यानबा तुकारामाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे.

 

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आस या वारक-यांमध्ये दिसतेय.. मंदिराच्या परिसरात पालखी दाखल झाली असून, मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम सरकारवाड्यात असणार आहे.

 

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा तथा पायीदिंडी आज नामदेवाचे जन्म स्थान असलेल्या नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्याची सांगता ३ जुलै रोजी होणार आहे.

 

व्हिडिओ पाहा

[jwplayer mediaid="117840"]