www.24taas.com, कोल्हापूर
निवडणुकीत मतदान करतांना नकाराधिकार असला पाहिजे आणि एकदा नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ नये असा कायदा करण्याची गरज आहे. तेव्हाच राजकारणाचे शुद्धीकरण होईल त्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळणार नाही. असं मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे. पण अण्णांनी काही वादग्रस्त विधाने देखील केली.
ते कोल्हापुरात जाहीर सभेत बोलत होते. अण्णांची ही २९ वी सभा होती. आजपासून ते कोकण दौऱ्यावर आहेत. चांगले राजकारणी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळेच पाकिस्तानपेक्षा राज्याच्या खेडोपाड्यात अधिक दहशतवाद असल्याचंही अण्णा हजारे म्हणाले.
अण्णांच्या मार्गावर ब्लॅक पँथरनं आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र अण्णांनी राज्यघटनेची पूजा करून शाहू महाराजांना वंदन केलं. त्यामुळे अण्णांचा दौरा निर्विघ्न पार पडला.