'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या...'

Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 10, 2024, 05:48 PM IST
'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या...'

Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे. ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण घाणेरडं, गलिच्छ, गढूळ केलं आहे. जो पक्ष भाजपाला पाठिंबा देत आहे, तो महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम करत आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत महत्वकांक्षेतून हे झालं. मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचंय यासाठी भाजपशी सौदा गेला. व्यक्तिगत नसतं तर तेव्हाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं. मोदी, अमित शहा वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली. तसंट महाराष्ट्रात आज जो चिखल झाला आहे त्यासाठी उद्दव ठाकरेच जबाबदार आहेत असंही म्हटलं. 

Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं

 

Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच आहेत. सुरुवातीला तुम्ही शरद पवारांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणार तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहीलं इथे? अशी भिती राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "एकमेकांच्या वतीने भाजपा आणि मनसेने बोलू नये. मी त्याच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही. पण भीतीदायक बाब म्हणजे जी मनसे महाराष्ट्रातील भुमीपूत्रांसाठी लढत आहे असं वाटायचं ती आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढू लागली आहे. ज्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून मोठे उद्योग गुजरातला नेले, महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या गुजरातला नेल्या त्याच मोदी साहेबांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे, ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण घाणेरडं, गलिच्छ, गढूळ केलं आहे. जो पक्ष भाजपाला पाठिंबा देत आहे, तो महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम करत आहे".  

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More