पुण्यात तमिळ अभिनेत्रीचं सेक्स रॅकेट..

पुण्यात सध्या सुरू आहे हायप्रोफाईल सेस्क रॅकेट. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका तमिळ मॉडेल अभिनेत्रीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कॅरोलीन एम असं या मॉडेलचं नाव असून तमिळनाडूतल्या डायमंड आणि टेक्सटाईल उद्योगातली ती आघाडीची मॉडेल आहे.

Updated: Feb 5, 2012, 06:13 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात सध्या सुरू आहे हायप्रोफाईल सेस्क रॅकेट. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका तमिळ मॉडेल अभिनेत्रीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कॅरोलीन एम असं या मॉडेलचं नाव असून तमिळनाडूतल्या डायमंड आणि टेक्सटाईल उद्योगातली ती आघाडीची मॉडेल आहे. तिच्या सह तिच्या पीएलाही अटक करण्यात आली आहे.

 

पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेली प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री वेश्या व्यवसाय करत असल्याचा केरोलिनवर आरोप आहे. एक प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री पुण्यात वेश्या व्यवसाय कऱण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं सापळा रचून कॅरोलिनसह तिचा पी.ए. राजकुमारलाही अटक केली.

 

नगर रस्त्यावरच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलातून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. कॅरोलिननं तीन तमिळ चित्रपटांत काम केलं असून ती तमिळनाडूतल्या डायमंड आणि टेक्सटाईल उद्योगातली आघाडीची मॉडेल आहे. वेश्याव्यवसाय करणऱ्या अभिनेत्रीला पकडण्याची पुण्यातली ही पहिलीच घटना नाही गेल्या दोन महिन्यातली ही चौथी घटना असल्यानं पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जाते आहे.