IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर या सीरिजचा दुसरा सामना आयोजित करण्यात आला असून शनिवारी याचा दुसरा दिवस होता. मात्र दुसऱ्या दिवशी मैदानात पावसाची बॅटिंग चालल्याने एकही बॉल न खेळवता खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी सुद्धा पावसामुळे सामना केवळ 35 ओव्हरचा खेळ घेण्यात आला होता.
भारत - बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या सीरिजमधील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून 280 धावांनी सामना जिंकला आणि सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. कानपूर टेस्टमध्येही टीम इंडिया बांगलादेशला पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सुरुवातीच्या दोन्ही दिवसाचा खेळ खराब झाला.
कानपूर येथील भारत विरुद्ध बांगलादेश टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि बांग्लादेशला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. यावेळी टीम इंडियाकडून आकाश दीपने बांगलादेशच्या दोन विकेट्स घेतल्या यात त्याने झाकीर हसन आणि शादमान इस्लामला बाद केले. तर 29 व्या ओव्हरला अनुभवी गोलंदाज आर अश्विनने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याची विकेट घेतली. यासह अश्विनने आशियायी खेळपट्टीवर 420 विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला. पहिल्या दिवशी बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या.
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद