दीपक शिंदे, www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या हिंद केसरीमध्ये महाराष्ट्राचं आव्हान उपउपांत्य फेरीतच संपुष्टात आलं होतं. महाराष्टाचे मल्ल चितपट झाल्यानं कोल्हापूरकर चांगलेच नाराज झाले. आता, विजयासाठी प्रमुख दावेदार असलेला रोहित पटेल, युद्धवीर नरेंद्र आणि हितेंद्र यांच्यामध्ये उपांत्य फेरीच्या लढती रंगणार आहेत.
कोल्हापूरच्या खासबाग मैदानाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच यावेळच्या हिंदे केसरी स्पर्धेला एक वेगळ वलंय निर्माण झालं आहे. मात्र, महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी सपशेल निराशा केल्यानं कुस्तीप्रेमींमध्ये चांगलीच निराशा दिसून येतेय. महाराष्ट्राच्या विजय बनकरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यालाही काहीच कमाल करता आली नाही. विजय बनकरचा दिल्लीच्या हितेंद्रनं पराभव केला. आता, उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये विजयाचा प्रमुख दावेदार आणि गतविजेता रोहित पटेलचा मुकाबला युद्ववीरशी होणार आहे.
त्यातच कोल्हापूरकरांचाही रोहितला चांगलाच पाठिंबा मिळाला आहे. तर उपांत्य फेरीची दुसरी लढत युद्धवीर आणि हितेंद्र यांच्यामध्ये होणार आहे. आता, या दोन्ही लढतीमध्ये अंतिम फेरीमध्ये कोण प्रवेश मिळवतो याकडेच कुस्तीप्रेमींच लक्ष असणार आहे. दरम्यान, अंतिम फेरीसाठी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांची खास उपस्थिती लाभणार आहे.