फेसबुकवर 'चुतियां'ची लागली वाट

तुम्ही चुतिया असलात तर तुमचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केलं जाण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेत चुतिया हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो त्यामुळे फेसबुकने हे पाऊल उचललं आहे.

Updated: Mar 15, 2012, 09:46 PM IST

www.24taas.com, गुवाहाटी

 

तुम्ही चुतिया असलात तर तुमचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केलं जाण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेत चुतिया हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो त्यामुळे फेसबुकने हे पाऊल उचललं आहे. पण फेसबुकने ऑल आसाम स्टुडंट्स युनियन या संघटनेच्या सर्व सदस्यांचे अकाऊंट ब्लॉक केले आणि गदारोळ माजला आहे.

 

आसाममधल्या चुतियाचा उच्चार सूतिया असा होतो आणि तो एक आसामी समुदाय आहे. पण फेसबुकने हिंदी भाषेतील अर्थ गृहित धरण्याची चूक केली.

 

आसाममधल्या चुतिया समाजाच्या सर्व सदस्यांची अकाऊंट याच गैरसमजातून ब्लॉक करण्यात आली आहेत. फेसबुकला वाटलं की ही सर्व खाती नकली आहेत. पण अनेकांना हे ठाऊकच नाही की आसाममध्ये चुतिया या समाजाला संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

 

राज्याच्या जडणघडणीत चुतिया राजवंशाने मोठं योगदान दिलेलं आहे. आसामचे राजे चुतिया होते हे आम्ही आदराने लिहित आहोत गैरसमज नसावा ही वस्तुस्थिती आहे

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x