फेसबुक @ 8 नॉटआऊट

लाखो दिल की धडकन बनलेला फेसबुकने अर्थातच fb ने आज म्हणता म्हणता आठ वर्ष पूर्ण केली आहेत. अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच या fb ने अक्षरश वेडावून सोडलं. जगभरात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली अशी एकमेव सोशल नेटवर्किंग वेबसाईट म्हणून fb ने अनेकांना सहजपणे भुरळ घातली.

Updated: Feb 6, 2012, 12:01 AM IST

www.24taas.com

लाखो दिल की धडकन बनलेला फेसबुकने अर्थातच fb ने आज म्हणता म्हणता आठ वर्ष पूर्ण केली आहेत. अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच या fb ने अक्षरश वेडावून सोडलं. जगभरात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली अशी एकमेव सोशल नेटवर्किंग वेबसाईट म्हणून fb ने अनेकांना सहजपणे भुरळ घातली.

सध्या फेसबुकचे जगभरात ८४५ दशलक्ष नोंदणीकृत यूजर्स असून यात दिवसेंदिवस भर पडते आहे. ऑगस्ट २०१२ पर्यंत फेसबुक यूजर्सची संख्या १ अब्ज होणार असा अंदाज आहे. जगभरातील कोट्यवधी नेटकऱ्यांचे संवादाचे अतिशय आवडते माध्यम म्हणून अल्पावधीत उदयास आलेले फेसबुक आठ वर्षांचे झाले आहे.

सध्या झुकेरबर्ग हा फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्याचे इतर तीन सहकारी एडवर्ड सॅव्हेरियन, डस्टिन मोस्कोव्हिट्झ आणि क्रिस हगेस हे सह-संस्थापक म्हणून काम पाहतातहॉवर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या इतर तीन मित्रांना फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटची कल्पना सूचली होती. तिथेच त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात अमलात आणली.