मोबाइल बिल ठरवणार 'होम लोन'

आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.

Updated: Jan 31, 2012, 11:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.

देशात मोबाईलधारकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एखाद्या ग्राहकाची मोबाईल बिल भरण्याची वृत्ती कशी आहे, याची चाचणीही तो त्याचं मोबाईल बिल किती वेळेत भरतो यावरून करता येणार आहे. यावर आधारित ग्राहकाची माहिती देणारा अहवाल बँकांकडे पाठवता येईल आणि त्याआधारे संबंधित ग्राहकाला कर्ज द्यायचे किंवा नाही हा निर्णय घेणं बँकांना सहज होईल. तसंच लँडलाईन आणि ब्रॉडबँड कनेक्शनच्या बिलावरही सिबिलचं बारकाईनं लक्ष असणार आहे.

या संदर्भात मोबाईल कंपन्यांची महत्त्वाची चर्चा सुरु असून मार्चपर्यंत याची पूर्णपणे अंमलबजावणी होऊ शकते. सिबिलकडे सर्व कर्जदारांची माहिती उपलब्ध असते. सध्या ३०० हून अधिक बँका वित्तसंस्था सिबिलच्या सदस्य आहेत आणि हे सर्व सदस्य दरमहा आपल्या ग्राहकांची माहिती सिबिलकडे पाठवत असतात. या माहितीच्या आधारे कर्जदार आपली स्वत:ची पतगुणवत्ता जाणून घेऊ शकतो.