आनंदला भारतरत्न द्यावा

विश्वनाथन आनंदनं वर्ल्ड चेस चॅम्पियन जिंकत इतिहास रचला. या रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे त्यानं आपणचं विश्वविजेता असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. पाचवेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन जिंकणा-या या चेस प्लेअरला भारतरत्न द्यावा अशी मागणी बुद्धीबळविश्वातून होतेय.

Updated: May 31, 2012, 05:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

विश्वनाथन आनंदनं वर्ल्ड चेस चॅम्पियन जिंकत इतिहास रचला. या रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे त्यानं आपणचं विश्वविजेता असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. पाचवेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन जिंकणा-या या चेस प्लेअरला भारतरत्न द्यावा अशी मागणी बुद्धीबळविश्वातून होतेय.

एकाग्रता आणि मानासिक कणखरतेच्या जोरावर भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद 64 घरांचा राजा बनला. रशियन सत्ता असेलल्या बुद्भीबळ जगतावर त्याचं 2007 पासून निर्विवाद वर्चस्व कायम आहे. आणि 2014 पर्यंत ते अबाधित रहाणार आहे. रशियन साम्राज्य खालसा करत आनंदनं भारतीय बुद्धीबळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नविन ओळख मिळवून दिली. भारतीय बुद्धीबळाचा तो ख-या अर्थानं चेहरा बनला आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये बोरिस गेलफंडवर मात करत त्यांनं पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. आनंदच्या या अविस्मरणीय़ कामगिरीमुळे त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न मिळावा अशी चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. अनेक आजी-माजी बुद्धीबळपटूंनी आनंदला भारतरत्न मिळावा असं मतही व्यक्त केलं आहे.

विश्वनाथन आनंदनं कोणालाही शक्य होणार नाही अशी कामगिरी करून दाखवली आहे. आपल्या बुद्धीबळाच्या करिअरमध्ये त्यानं भारताचा तिरंगा डौलानं फडकवला आहे. 42 वर्षीय आनंदनं केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या शानदार कामगिरीनं भारतीयांना नेहमीच त्यानं अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. त्यामुळे 64 घरांच्या या राजाला भारतरत्न मिळावा ही मागणी रास्त आहे असचं म्हणाव लागणार आहे.