हेअर स्टाईल... ग्लॅमरसाठी आहे नवी स्टाईल

टेनिसमधील ग्लॅमरची चर्चा नेहमीच होते. स्टेफी ग्राफपासून ते आत्ताच्या मारिया शारापोव्हानं टेनिसला आपल्या ग्लॅमरनं एकच वेगळ वलय निर्माण करुन दिलं आहे. तर आंद्रे आगासी आणि रॉजर फेडरर आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे स्टाईल आयकॉन बनले.

Updated: Mar 29, 2012, 09:05 AM IST

www.24taas.com

 

टेनिसमधील ग्लॅमरची चर्चा नेहमीच होते. स्टेफी ग्राफपासून ते आत्ताच्या मारिया शारापोव्हानं टेनिसला आपल्या ग्लॅमरनं एकच वेगळ वलय निर्माण करुन दिलं आहे. तर आंद्रे आगासी आणि रॉजर फेडरर आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे स्टाईल आयकॉन बनले.

 

टेनिस लोकप्रिय होण्यामागे त्या खेळाला असलेलं ग्लॅमरही तितकचं महत्त्वाच आहे. टेनिसस्टार जॉन मॅकेनरोला तर क्रिकेटचा बेताज बादशाहा अर्थातच सचिन तेंडुलकरनं फॉलो केलं. आणि कुरळ्या केसांमधील सचिन डोक्याला हेअर बँड आणि हातमध्ये हँड बँड घालत चक्क मॅकेनरो म्हणून लहानपणी आपल्या मित्रांमध्ये वावरलाही होतो. टेनिसस्टारच्या ड्रेसिंग स्टाईल आणि हेअर स्टाईल युवकांमध्ये चांगल्य़ाच पॉप्युलर झाल्या. स्टेफी ग्राफनं आपल्या टेनिसनं अवघ्या जगाला वेड तर लावलचं होतं. शिवाय तिच्या ग्लॅमरस लूकमळे ती अधिक लोकप्रिय झाली होती. स्टेफीनंतर खरं ग्लॅमर टेनिसमध्ये आणलं ते ऍना कुर्निकोव्हानं.

 

आपल्या टेनिससाठी नाही तर आपल्या ग्लॅमरस लूकनं तिनं आपल्या चाहत्यांवर मोहीनी टाकली. टेनिसमध्ये एकही ग्रॅन्ड स्लॅम तिला जिंकता आलं नाही. मात्र, पॉपस्टार बॉयफ्रेंड एनरिके इग्लिसियासशी तिचं नाव चर्चेत आलं आणि ती अधिकच चर्चेत आली. यानंतर टेनिस कोर्टपेक्षा एखाद्या ब्रँडचं एँडोसमेंट्स करतांनाच ती अधिक दिसली. कुर्निकोव्हानंतर आणखी एक रशियन ब्युटी टेनिस जगताला मिळाली. आणि ती म्हणजे मारिया शारापोव्हा. शारापोव्हानं टेनिस कोर्टवरही आपला जलवा दाखवला आणि टेनिस कोर्टबाहेरही तिनं आपला जलवा दाखवला.

 

रँपवरही शारापोव्हाच्या फॅशनचा जलवा पाहायला मिळा होता. ग्लॅमरमुळे चर्चेत केवळ महिला टेनिस्टार नाहीत. तर आंद्रे आगासी आणि रॉजर फेडररनं आपल्या खेळानं आपलं करिअर गाजवलचं आहे. मात्र, या दोघांनी आपल्या लांब केसांन चाहत्यांवर चांगलीच भुरळ पाडली. त्यानंतर आगासीनं टक्कल केलं आणि तेही एक स्टाईल स्टेटमेंट ठरलं. तर सुरुवातीलाच लांब केसांमध्ये टेनिस कोर्ट गाजवणारा फेडरर छोट्या केसांतही त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. आज टेनिसविश्वचा तो अनभिषिक्त सम्राट आहे. या टेनिसपटूंनी आपल्या स्टाईल स्टेटमेंटनं स्टाईल आयकॉन्सचं बिरुद मानानं कायम राखलं आहे.