www.24taas.com, मुंबई
टीम इंडियाची अभेद्य भिंत अर्थातच राहुल द्रविडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. राहुलने गेल्या १५ वर्षापासून आपल्या तंत्रशुद्ध बॅटिंगनं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय.
१९९६ मध्ये राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश झाला. टेस्टमधील या तंत्रशुद्ध बॅट्समननं वनडेमध्येही थोड्या कालावधीत आपल्य़ा भोवती एक वेगळ वलय निर्माण केलं. राहुलनं सिंगापूरमध्ये भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील ट्रँग्युलर सीरिजमधून वन-डेत पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच वनडे मॅचमध्ये त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र पहिल्याच टेस्टमध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध लॉर्डसवर शानदार ९५ धावांची खेळी केली. त्यानंतर राहुलनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. गेली पंधरा वर्षं तो अवरित भारतीय क्रिकेटची सेवा करत आहे.राहुलनं आपल्या तंत्रशुद्ध आणि क्लासिक बॅटिंगनं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. राहुल द्रविड टीम इंडियाच्या बॅटिंगचा प्रमुख आधारस्तंभ ठरला.
राहुलने आत्तापर्यंत १६४ टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. १३ हजार २८८ रन्स त्याच्या बॅट्समनधून आले आहेत. द्रविडने ३६ आंतरराष्ट्रीय टेस्ट सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्याने ५२.३१ च्या सरासरीने रन्स काढल्या आहेत.
राहुलनं आपल्या जिगरबाज बॅटिंगनं नेहमीच भारताच्या इनिंगला आकार दिला आणि अनेक अविस्मरणीय इनिंगही खेळल्या.टीमसाठी केवळ बॅटिंगचं नव्हे तर विकेट किपिंगची जबाबदारी त्यानं अंगवार घेतली आणि यशस्वी पार पाडली.त्यामुळेच क्रिकेटसाठी नेहमी समर्पित राहिलेल्या द्रविडची उणीव भऱून काढणे टीम इंडियासाठी अवघड असणार आहे.