कोहलीची वन डे मध्ये 'विराट' कामगिरी

कोहली यंदाच्या वर्षात एक दिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने चार शतकांसह ४७.६२ च्या सरासरीने १३८१ धावा फटकावल्या.

Updated: Dec 31, 2011, 06:10 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

कोहली यंदाच्या वर्षात एक दिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने चार शतकांसह ४७.६२ च्या सरासरीने १३८१ धावा फटकावल्या.  मलेशियात २००६ साली एकोणीस वर्षाखालील वर्ल्ड कपचं विजेतेपद भारताने मिळवलं तेंव्हा एक रागीट दिसणाऱ्या युवकाची छबी सर्व भारतीय वर्तमानपत्रात झळकली होती. तो होता विजयी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील उगवता तारा असं त्याचा वर्णन करण्यात आलं होतं. श्रीलंकेत त्याने दोन वर्षांनी पदार्पण केलं आणि त्याच्या दमदार कारकिर्दीला सुरवात झाली.

दक्षिण आफ्रिका डर्बनला अवघड परिस्थितीत त्याने २०११ साली ५४ धावांची खेळी उभारली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं. वर्ल्डकपमध्ये त्याने बांग्लादेशाविरुद्ध घणाघाती शतक ठोकलं आणि बॉलर्सना अक्षरश: सोलून काढलं. त्यानंतर त्याने २८२ धावांची मोठी खेळी उभारली आणि जगातल्या सर्वोत्कृष्ट संघातलं आपलं स्थान पक्क केलं. पण त्याने इंग्लंडमधल्या पहिल्या कसोटीत ५५ धावा आव्हानात्मक परिस्थिती काढल्या. इंग्लंडमधल्या मालिकेत भारताची कामगिरी सुमार झाली असली तरी कोहलीने चांगला परफॉर्मन्स दिला होता. घरच्या मैदानावर कोहलीने आत्मविश्वासाने चांगली फलंदाजी करत वेस्ट इंडिज विरुध्द शतक ठोकलं आणि वर्षा अखेर गोड केली.