पुणे वॉरिअर्सची धुरा 'दादांवर'

आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे वॉरिअर्सच्या प्रशिक्षकाची कमान आता टीम इंडियाचा बेधड माजी कर्णधार सौरव गांगुली संभाळणार आहे. त्याच्यातील आक्रमकता पुणे वॉरिअर्स संघाच्या अंगी येईल का, याचीच उत्सुकता आहे. सौरव गांगुली हा आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी पुणे वॉरिअर्स संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश केला आहे.

Updated: Jan 21, 2012, 03:56 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या  पुणे वॉरिअर्सच्या प्रशिक्षकाची कमान आता टीम इंडियाचा बेधड माजी कर्णधार सौरव गांगुली संभाळणार आहे. त्याच्यातील आक्रमकता पुणे वॉरिअर्स संघाच्या अंगी येईल का, याचीच उत्सुकता आहे.

 

सौरव गांगुली हा आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी पुणे वॉरिअर्स संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश केला आहे. तर  ऍलन डोलाल्ड यांचा  संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक, तर सौरव गांगुली खेळाडू आणि मेंटर अशी दुहेरी भूमिका निभावणार आहे. असे असले तरी यंदाच्या मोसमात पुणे वॉरिअर्सचा संघ प्रशिक्षकाविना खेळणार आहे.

 

याआधी पुण्याचे प्रशिक्षक असलेले जेफ मार्श श्रीलंका संघाचे प्रशिक्षक झाले आहेत. त्यामुळे ते चौथ्या मोसमात संघ प्रशिक्षकाविना खेळणार आहे. डोनाल्ड आणि गांगुली यांच्याबरोबर मानसिक तज्ज्ञ पॅडी उप्टॉन आणि फलंदाजीचे प्रशिक्षक प्रवीण आमरे हे काम करणार आहेत.

 

डोनाल्ड हे सध्या दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. आयपीएल एप्रिल आणि मे महिन्यात होत असून, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. त्यामुळे डोनाल्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.