बॉलीवूड संगे आयपीएल रंगे.....

जगातील सगळ्यात महागड्या अशा t-20 क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या पाचव्या सत्राचा आज उद्घाटन सोहळा चेन्नईच्या वाईएमसीए मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला अमेरिकेतील पॉप स्टार केटी पेरी असणार आहे.

Updated: Apr 3, 2012, 02:07 PM IST

www.24taas.com, चेन्नई

 

जगातील सगळ्यात महागड्या अशा t-20 क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या पाचव्या सत्राचा आज उद्घाटन सोहळा चेन्नईच्या वाईएमसीए मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला अमेरिकेतील पॉप स्टार केटी पेरी असणार आहे. देशातील उत्कृष्ट असा डांन्सर आणि टॉलीवूडचा अभिनेता प्रभु देवा हा देखील आपले जलवे दाखवणार आहे. 'बीग बी' अमिताभ बच्चन हे प्रसून जोशी यांच्या एका कवितेने आयपीएलचं उद्घाटन करतील

 

बॉलीवूडमधून या सोहळ्यासाठी करीना कपूर, प्रियंका चोप्रा, सलमान खान, हे देखील उपस्थित असणार आहेत. सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे केटी पेरी असणार आहे. ती पहिल्यांदाच भारतात येणार आहे. पेरीला पाहण्यासाठी लोकांमध्ये खूपच उत्साह आहे.

 

अमिताभने  ट्विटरवर नुकतचं ट्विट केलं की, आयपीएलच्या सोहळ्यासाठी ते चेन्नईमध्ये आहे, आणि चेन्नई हे त्यांना आपलं दुसरं घरचं वाटतं. त्याचं म्हणणं आहे की, या शहरात त्यांनी अनेक सिनेमांसाठी काम केलेलं आहे.

 

आयपीएलच्या पाचव्या सत्राची सुरवात चार एप्रिल पासून होणार आहे. आणि 27 पर्यंत आयपीएलची मजा घेता येणार आहे. या टुर्नामेंटमध्ये 9 टीम सहभागी होणार आहे. 12 वेगवेगळ्या ठिकाणी 76 मॅच खेळविण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याला नऊही टीमचे कॅप्टन असणार आहेत.

 

बुधवार पासून या टूर्नामेंटला सुरवात होणार आहे. 4 एप्रिलला पहिली मॅच होणार आहे. मागील वर्षाचे चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स आणि रनर अप मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला t-20 सामना होणार आहे.