सचिनच्या सर्वोत्कृष्ट शतकी खेळी....

सचिन तेंडुलकरने मिरपूरच्या मैदानावर शंभरावे शतक झळकावत नवा इतिहास घडवला. जगभरातील सचिनचे चाहते ज्या क्षणांची गेली वर्षभर प्रतिक्षा करत होते तो प्रत्यक्षात अवतरला. सचिनच्या शंभर शतकांमधील सर्वोत्कृष्ट शतकं निवडणं म्हणजे अलिबाबाच्या खजिन्यातील रत्नभांडारातील मूल्यवान रत्नं शोधण्याचा प्रयत्न करणं. सचिनच्या सर्व शतकी खेळी सरस आहेतच पण तरीही त्यातील काही संस्मरणीय शतकांचा हा आढावा.

Updated: Mar 16, 2012, 06:46 PM IST

 www.24taas.com, मुंबई

 

सचिन तेंडुलकरने मिरपूरच्या मैदानावर शंभरावे शतक झळकावत नवा इतिहास घडवला.  जगभरातील सचिनचे चाहते ज्या क्षणांची गेली वर्षभर प्रतिक्षा करत होते तो प्रत्यक्षात अवतरला. सचिनच्या शंभर शतकांमधील सर्वोत्कृष्ट शतकं निवडणं म्हणजे अलिबाबाच्या खजिन्यातील रत्नभांडारातील मूल्यवान रत्नं शोधण्याचा प्रयत्न करणं. सचिनच्या सर्व शतकी खेळी सरस आहेतच पण तरीही त्यातील काही संस्मरणीय शतकांचा हा आढावा.

 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थच्या मैदानावर १९९२ साली ११४ धावांची शतकी खेळी

 

भारतीय संघाची पडझड होत असताना सचिनने खेळपट्टीवर ११४ धावांची धीरोदात्त खेळी केली. एकीकडे भारतीय फलंदाज बाद होत असताना सचिनने न डगमगता खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आक्रमणाला तोंड देत शतक झळकावलं त्यामुळे अनेक जण त्याचे चाहते झाले आणि त्यात ऑल टाईम ग्रेट सर डॉन ब्रॅडमन यांचाही समावेश होता.

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९७ साली केप टाऊनच्या मैदानावरची १६९ धावांची शतकी खेळी.

 

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५२९ धावांचे मोठं आव्हान भारतासमोर ठेवलं आणि भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. भारताची अवस्था पाच बाद ५८ अशी बिकट झाली. यावेळेस सचिन तेंडलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोख उत्तर देण्याचा निर्धार केला. ऍलन डोनाल्ड, ब्रायन मॅकमिलन आणि शॉन पॉलक अशा तोफखान्याची तमा न बाळगता या दोघांनी तडाखेबंद खेळ केला. अझरुद्दीन आणि तेंडुलकर यांनी दोन सत्रात २२२ धावांची खेळी उभारली. भारताने सामना आणि मालिका जरी गमावली तरी सचिनच्या शतकाची सर्वत्र चर्चा होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई इथे १९९८ साली झळकावलेलं शतक.

 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९९८ सालची बॉर्डर-गावस्कर मालिका ही सचिन-वॉर्न यांच्यातील चकमकीसाठी ओळखली जाते. सचिनने तोवर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असा नावलौकिक प्राप्त केला होता. तर वॉर्नने सामना जिंकून देणारा लेग स्पिनर आपल्या कारकिर्दीचे शिखर गाठले होते. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात वॉर्नच्या गोलंदाजीवर सचिन स्वस्तात बाद झाला. पण दुसऱ्या डावात सचिनने त्याची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. सचिनच्या १५५ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे भारताने सामना तर जिंकलाच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वॉर्न परत भारतासाठी धोकादायक ठरु शकणार नाही हे पक्क केलं.

 

शारजात १९९८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेली १३४ धावांची शतकी खेळी

 

शारजात तीन देशांच्या सिरीजच्या साखळी सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फटकावलेल्या १४३ धावांच्या शतकी खेळीने भारते अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सचिनने आणखी एक शतक झळकावत सामना आणि विजेतेपदावर भारताचं नावं कोरलं. सचिनने आपल्या २५ व्या वाढदिवशी केलेले शतक हे क्लासिक याच सदरात गणलं जातं. ऑस्ट्रेलियाने केलेल्या २७२ रन्सचा पाठलाग सचिनच्या शतकामुळे भारताने सहज पार केल . सचिनचा प्रत्येक फटका खणखणीत असाच होता.

 

पाकिस्तान विरुद्ध चेन्नईला १९९९ साली फटकावलेल्या १३६ धावा

 

अनेक जणांच्या मते सचिनची ही आजवरची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. पाकिस्तानच्या २७१ धावांचा पाठलाग करताना भारताची नेहमीप्रमाणेच वाताहात झाली. त्यातच सचिनला पाठदुखीने त्रस्त केलं होतं. चेपॉकच्या खेळपट्टीवर समोर सकलेन मुश्ताकाच्या गोलंदाजीला तोंड देत सचिनने सहा तास बॅटिंग करत आपला क्लास दाखवून दिला. सचिन १३६ धावांवर बाद झाला तेंव्हा भारताला विजयासाठी फक्त २० धावा हव्या होत्या आणि चार विकेटस हातात होत्या. पण दुर्दैवाने भारताचा डाव नंतर फक्त १२ धावात आटोपला.

 

केनिया विरुद्ध ब्रिस्टॉल इथे १९९९ साली केलेली १४० धावांची शतकी खेळी

 

वर्ल्डकपमध्ये केनिया सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध केलेल्या सचिनच्या शतकी खेळीला वेगळं