झी २४ तास वेब टीम, मुंबई
टीम इंडियाच्या सर्वाधिक अपेक्षा या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून असणार आहेत. १९९२ मध्ये ज्यावेळी तो कांगारु दौऱ्यावर गेला होता. आपल्या पहिल्याच कांगारु दौऱ्यामध्ये त्यानं दोन सेच्युरी ठोकण्याचा पराक्रम केला होता. आणि आतापर्यंत सचिननं ऑस्ट्रेलियामध्ये सहा सेंच्युरी झळकावल्या आहेत. योगायोग असा की, ज्या देशानं त्याला क्रिकेटविश्वात ओळख मिळवून दिली त्याच देशात त्याला महासेंच्युरी ठोकण्याची संधी आहे.
१९ वर्षापूर्वी सचिन तेंडुलकरचा प्रवास इथूनच सुरु झाला होता. आणि या प्रवासाची ऐतिहासिक नोंद होणार आहे. सचिन ज्यावेळी १९ वर्षांचा होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये त्याची पहिली परीक्षा होती. सिडनीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्यानं १४८ रन्सची इनिंग खेळली. आणि पर्थवर ११४ रन्सची.यानंतर सचिन जेव्हाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला तो सेंच्युरी झळकावल्याशिवया मायदेशात परतलाच नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सचिननं आत्तापर्यंत १६ टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. आणि जवळपास ५९ च्या सरासरीनं १५२२ रन्स केले आहेत. ज्यामध्ये एका डबल सेंच्युरीचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सचिननं आत्तापर्यंत ७ सेंच्युरीज ठोकल्या आहेत.
आता क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती, महसेंच्युरीची. आशा आहे की ही शंभरावी सेंच्युरी ऑस्ट्रेलियात पूर्ण होईल. सचिन २००७ मध्ये सर्वाधिक रन्स करणारा क्रिकेटपटू ठरला होता. चार टेस्टमध्ये त्यानं ७१ च्या सरासरीनं ४९३ रन्स केले होते. यामध्ये दोन सेंच्युरींजचा समावेश होता. मागील दौऱ्यामध्ये त्यानं ऑस्ट्रेलियात आपली पहिली वन-डे सेंच्युरी झळकवली होती. ती पण ब्रिसबेनच्या बाऊंसी पीचवर. २००४ मध्ये सचिननं सिडनीमध्ये २४१ रन्सची अविस्मरणीय इनिंग खेळली होती. सचिनचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त आहे. त्यामुळे त्याची महासेंच्युरी ऑस्ट्रेलियातच व्हावी अशी तमाम भारतीयांची इच्छा असणार आहे.