www.24taas.com, पर्थ
श्रीलंकेच्या २३३ धावांचा पाठलाग करताना भारताला पहिला झटका बसला. सेहवाग मलिंगाच्या चेंडूवर थर्डमॅनच्या वरून षटाकार मारण्याचा नादात झेल बाद झाला. त्याने ८ चेंडूत १० धावा केल्या.
मॅचचे LIVE अपडेट पाहाण्यासाठी क्लिक करा.
या पूर्वी लंकेने भारतासमोर २३४ रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. लंकेने ८ विकेटच्या बदल्यात २३३ रन्स केल्या. लंकेकडून सर्वाधिक रन्स चंदीमलने केल्या. त्यांने ८१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. अँजलो मॅथ्यूज आणि मलिंगा नाबाद राहिला. मॅथ्यूजने ३३ तर मलिंगाने १ रन्स केली. तर भारताकडून सर्वाधिक विकेट आर. अश्विनने घेतल्या. त्यांने तिन बळी टिपले.
झटपट धावा काढण्याचा नादात तिरीमाने सात धावांवर बाद झाला. त्याला रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने तंबूचा रस्ता पकडावा लागला. श्रीलंकेची बाजू सांभाळणाऱ्या चंदीमलला आर. अश्विनने धोनीकरवी झेलबाद केले. चंदीमलने ८१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. यात त्याने चार चौकार लगावले. या विकेटमुळे अश्विनने तिसरी विकेट घेतली. भारतीय गोलंदाजीमुळे लंकेला जास्त धावसंख्या उभारता आली नाही.
यापूर्वी जयवर्धनला तंबूत परतावणाऱ्या आर अश्विनने परेराला ७ रन्सवर आऊट करून पाचवी विकेट काढली. श्रीलंकेची चौथी विकेट काढण्यात भारताच्या आर अश्विनला यश आले. त्याने जयवर्धन २३ रन्सवर रोखले. श्रीलंकेने डावाला चांगली सुरूवात केली होती. चांगली धावसंख्या उभी राहत असताना २६ रन्सवर कुमार संगकारा आऊट झाल्याने लंकेला तिसरा धक्का बसला. संगकाराने तिलकरत्ने दिलशानसोबत ६२ धावांची भागीदारी केली. सलामीवीर उपुल थरंगालाही झहीरनेच बाद केले. थरंगा ४ धावा काढून तंबूत परतला. झहीरला समोर येऊन फटकाविण्याच्या नादात पहिल्या स्लिपमध्ये त्याचा झेल गेला. सचिनने हा झेल सहज टिपला. त्यानंतर तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा यांनी अर्धशतकी भागीदारी करुन श्रीलंकेचा डाव सावरला. दिलशानने स्थिरावल्यानंतर आक्रमक पावित्रा घेऊन फटकेबाजी केली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मॅच पर्थमध्ये सुरू झाली असून श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. श्रीलंकेने २ विकेटच्या जोराव १०० रन्स केल्या. दुसरही विकेट झहीरने काढली. श्रीलंकेला पहिला धक्का झहीर खानने दिला. त्यांने सचिन तेंडुलकरद्वारे थरंगाला कॅच आऊट केले.पहिल्या मॅचमध्ये कांगारूंकडून पराभव सहन कराव्या लागलेल्या टीम इंडियाकडे सीरिजमध्ये कमबॅक करण्याची नामी संधी आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर पहिल्यांदाच भारत आणि श्रीलंका आमने-सामने आले आहेत.