www.24taas.com, मुंबई
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्यामुळे टी.पी. सुधींद्रवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. तर शलभ श्रीवास्तवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मोहनिश मिश्रा, अमित यादव आणि अभिनव बाली या तीन क्रिकेटपटूंवर एकेक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
आयपीएलमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी पाच दोषी क्रिकेटपटूवर बीसीसीआय़नं बंदीची कारवाई केली आहे. रवी सावानी यांच्या चौकशी अहवालानंतरच या क्रिकेटपटूंवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. डोमेस्टिक क्रिकेट मॅचमध्ये स्पॉट फिक्स करण्यासाठी सुधींद्रनं पैसे स्वीकारल्याचं सिद्ध झाल्याचं सिद्ध झालं आणि त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.
एका चॅनलनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे पाचही क्रिकेटपटू दोषी आढळले होते. या प्रकऱणानंतर त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्धझाल्यामुळे त्यांना बंदीच्या कारवाईला समोर जाव लागलं आहे.