निवासी शाळेतल्या ७३ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा

बुलडाणा जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी मुलींच्या शाळेतल्या ७३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 29, 2013, 09:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी मुलींच्या शाळेतल्या ७३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झालीय.
अळ्या, टाचण्या आणि किडे असलेल्या जेवणामुळे ही विषबाधा झालीय. पाचवी ते नववी या इयत्तांमध्ये जवळजवळ २३० विद्यार्थीनी शिक्षण घेतात. यापैंकी जवळपास १०० विद्यार्थीनींनी शाळेनं पुरविलेलं निकृष्ट अन्न खाल्लं होतं. त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. या १०० पैकी ७३ जणींवर सईबाई मोटे शासकीय रुग्णायालात विद्यार्थिनींवर उपचार सुरु आहेत.

विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणामध्ये शिजलेले किडे निघाले होते. त्यामुळे जेवण हे निकृष्ट धान्यापासून तयार करण्यात आलं असल्याचं उघड झालंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.