नोकरीचं अमिष दाखविणाऱ्या बबली बंटीला अटक

सरकारी नोकरीचं अमिष दाखवून राज्यातल्या हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या बंटी बबलीचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हेमराज आणि रुपाली पाटोडेकर असं या बंटी बबलीचं नाव आहे. त्यांनी महिला व्यवसाय प्रसिक्षण संस्थेच्या नावाखाली ही फसवणूक केलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 15, 2013, 02:34 PM IST

www.24taas.com, अमरावती
सरकारी नोकरीचं अमिष दाखवून राज्यातल्या हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या बंटी बबलीचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हेमराज आणि रुपाली पाटोडेकर असं या बंटी बबलीचं नाव आहे. त्यांनी महिला व्यवसाय प्रसिक्षण संस्थेच्या नावाखाली ही फसवणूक केलीये.
पहिल्यांदा त्यांनी राज्यातल्या प्रमुख वर्तमानपत्रात सरकारी नोकरीची जाहीरात आहे असं भासवणारी जाहीरात केली. सुरुवातीला अर्ज करणा-या महिलांकडून ५० रुपयांचा पोस्टल ऑर्डर मागवण्यात आले. याला प्रतिसाद म्हणून तब्बल ४० हजार महिलांचे पोस्टल ऑर्डरसह अर्ज आले. यातल्या १५हजार महिलांना तुमची निवड झाल्याचं सांगून त्यांना एक हजार रुपये पाटोदेकर याच्या बँक खात्यावर भरायला सांगितले.

काही महिला उमेदवारांना याचा संशय आल्यानं त्यांनी अमरावतीच्या जिल्हा उपसंचालक रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता हा फ्रॉड उघडकीस आला. पण तोपर्यंत राज्यातल्या हजारो तरुणींना गंडा घातला गेला होता. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी हेमराज आणि रुपालीला अटक केलीये.