www.24taas.com,झी मीडिया, बीड
बीडमध्ये तांदूळ खाल्यानं दहा गाईंचा मृत्यू झालाय. रस्त्यावर पडलेला युरिया खाल्ल्याने रविवारी दुपारी २७ गायींना विषबाधा झाली. त्यातील दहा गायी दगावल्या उर्वरित १७ गायींवर नारायणगडावर उपचार सुरू आहेत.
तत्काळ उपचार सुरू केल्यामुळे पाच गायी धोक्याबाहेर आल्या. तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी गडावर तळ ठोकून आहेत. नारायणगडावर २५० गुरे सांभाळली जातात. यात गावरान गायींची संख्या अधिक आहे. डोंगर हिरवेगार झाल्याने गुरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती.
सकाळी११ वाजता तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील कृषी दुकानदार सखाराम काशीद यांच्या कृषी केंद्रात खताचा ट्रक आला. नवगणराजुरी-नारायणगडमार्गे परळीकडे जाताना ट्रक साफ करताना खत व गहू रस्त्यावर टाकण्यात आला. हा गहू आणि तांदूळ गडावरील गाई आणि इतर जनावरांनी खाल्ला. त्यमुळे यातील दहा जनावरे जागीच मृत पावली. घटनास्थळी जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्यासह अधिकार्यांनी भेट दिली.
नवगणराजूरी-नारायणगडमार्गे परळीकडे जाताना खतांचा ट्रक साफ करताना ट्रकमधील खत आणि धान्य रस्त्यावरच टाकण्यात आले होते. हेच धान्य खाऊन जनावरांना विषबाधा झालीय. तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील कृषी दुकानदार सखाराम काशिद यांच्याकडे हा खताचा ट्रक आला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.