पाणी आलं आणि ते नाच नाच नाचले...

आता बातमी आहे मराठवाड्यातील जनतेला आणि जालनाकरांना दिलासा देणारी. यावर्षी दुष्काळाचा भयंकर सामना करणाऱ्यां नागरिकांना लवकरच पाणीटंचाइपासून मुक्ती मिळणार असल्याची चिन्हं आहेत. या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करताना रस्त्यावर नाचनाच नाचले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2013, 08:36 AM IST

www.24taas.com,झी मीडिया,जालना,
आता बातमी आहे मराठवाड्यातील जनतेला आणि जालनाकरांना दिलासा देणारी. यावर्षी दुष्काळाचा भयंकर सामना करणाऱ्यां नागरिकांना लवकरच पाणीटंचाइपासून मुक्ती मिळणार असल्याची चिन्हं आहेत. या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करताना रस्त्यावर नाचनाच नाचले.
गेल्या सात वर्षांपासून जालन्यातील नागरिक ज्या जायकवाडी-जालना योजनेच्या पाण्याची वाट पाहत होते ते पाणी अखेर जालन्यात दाखल झालंय. गेल्या महिनाभरापासून या योजनेची चाचणी सुरु होती. अखेर ही चाचणी यशस्वी झालीय.. इथल्या इंदेवाडी जलकुंभात जायकवाडीचं पाणी दाखल झालंय.. पाणी येताच इथल्या नागरिकांनी एकच जल्लोष करत फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार कैलास गोरंत्याल यांनी यावेळी जलपूजन केलं.

२६२ कोटी रुपये खर्चून ही योजना पूर्ण करण्यात आलीय. २००६ साली केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी या योजनेतून जालन्यासाठी ही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली . दरम्यान या योजनेची चाचणी यशस्वी झाल्यान दोन ते तीन दिवसांत जालन्यातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा केल्या जाणार असल्याची माहिती खासदार दानवे यांनी दिलीय.
मराठवाड्यासाठी नगर जिल्ह्यातल्या भंडारदारा, मुळा धरणांपाठोपाठ निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. १७०० क्युसेक्स पाणी प्रवरा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरूवात झालीये. मात्र अत्यंत कमी वेगानं सोडलं जात असलेलं हे पाणी प्रत्यक्षात जायकवाडीच्या कॅचमेंटमध्ये कधी पोहोचेल का आणि पोचलंच तर किती, हा प्रश्न आहे.
नाशिक-नगर जिल्ह्यांमध्ये पाणी सोडण्यास होत असलेला विरोध लक्षात घेता याबाबत प्रचंड गोपनियता बाळगण्यात येतेय. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर आणि करंजवण धरणातून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.