सलमान खानतर्फे बीडला १०० पाण्याच्या टाक्या

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या जनतेला अभिनेता सलमान खाननं मदतीचा हात दिलाय. त्याच्या बिईंग ह्युमन या संस्थेनं पाठवलेल्या 100 पाण्याच्या टाक्या बीडमध्ये दाखल झाल्यात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2013, 06:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीड
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या जनतेला अभिनेता सलमान खाननं मदतीचा हात दिलाय. त्याच्या बिईंग ह्युमन या संस्थेनं पाठवलेल्या 100 पाण्याच्या टाक्या बीडमध्ये दाखल झाल्यात.
सलमान खाननं दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तब्बल अडीच हजार पाण्याच्या टाक्या देण्याचा निर्णय घेतलाय. यातल्या साडेसातशे टाक्या बीड जिल्ह्याला मिळणारेत. तीन टप्यात या टाक्या बीडमध्ये पोहचणार असून पहिल्या टप्यातल्या शंभर टाक्या बीडला दाखल झाल्यात. बीडला मिळणा-या साडेसातशे टाक्यांपैकी दीडशे टाक्या बीडला, पावणेदोनशे टाक्या प्रत्येकी गेवराई आणि आष्टीला, सव्वाशे टाक्या पाटोदा आणि शिरूर तालुक्याला दिल्या जाणार आहेत.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना बीड आणि उस्मानाबाद या दुष्काळ पीडीत गावातील भागांना सलमान खान टाक्यांचे वाटप करणार आहे. तसा प्रस्ताव त्यानं मराठवाड्याच्या विभागीय़ आयुक्तांना पाठवला होता. बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या मदतीचं नागरिकांनीही स्वागत केलय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.