www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद
अवैध धंद्यांना पायबंद घालण्याच्या मागणीसाठी पोलिसांना साकडे घालणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना पोलिसांच्या ताफ्यानं बेफाम मारहाण केली. गावक-यासोबतच पोलीसानीही, कायदा पायदळी तुडवत, गावक-यांच्या घराचे दरवाजे तोडत मारहाण केली.
पोलिसांच्या अत्याचाराची ही घटना सोमवारी पहाटे उस्मानाबादच्या कनग-यात घडली. त्यात महिलांही सुटल्या नाहीत. कुणाचे गुडघे तुटले. हाड फ्रँक्चर झालीत. संपूर्ण शरीरारवर भयंकर माराचे व्रण आहेत. विशेष म्हणजे प्रसार माध्यमापासून गावक-यांच्या जखमा लपवण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधीला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न उस्मानाबादच्या ग्रामीण पोलिसांनी केली.
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा गावात सोमवारी मध्यरात्री मोगलाई अवतरली...पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडले, ट्रक्टरच्या हेडलाईट्स फोडल्या...गावातल्या प्रत्येक घरात घुसून दिसेल त्या पुरुषाला अशी बेदम मारहाण केली..अंगावरच्या हे वळ सांगतात माराहाण किती जबरदस्त होती..आता या मंडळींना खाली बसता येत नाही..काही जण आयुष्यात पुन्हा चालू शकतील की नाही अशी भीती आहे..हे सगळं घडलं ते महिला बचत गटानं गावातली अवैध दारु बंद करण्याची मागणी केली त्यामुळं..
बचत गटानं दारु पकडून दिल्यावर गावात अवतरलेल्या पोलिसांनी पकडलेली दारु पोलिस स्टेशनला न नेता थेट जमिनीवर फेकून दिली. ही दारू नाही पाणी आहे असा बनाव सुरु केला...त्यातून महिला आणि पोलिस असा वाद झाला. पोलिसांनी महिलांना शिवीगाळ केली. ते बघून चिढलेल्या ग्रामस्थांनी या पोलिसांना मारलं...पोलिस अधिक्षक सचिन पाटलांना हे कळताच पाटील सगळा फौजफाटा घेवून गावात अवतरले..
विशेष म्हणजे रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत पोलिस ग्रामस्थांना मारत होते.. ग्रामस्थ सांगतात...पोलिस अधिक्षक सचिन पाटील..उपाधिक्षक वैशाली कडूकरांनी कर्मचाऱ्यांना घराघरातून गावक-यांना बाहेर काढून मारण्याचे आदेश दिले. या भयंकर घटनेचा या चिमुरड्यांच्या मनावर प्रचंड आघात झालाय.अवघं गाव अजूनही रडत आहे..कुणाच्याही घरची चूल पेटलेली नाही..दहशतीनं लोक फरार झालेत
घटनेनंतर पोलिसांनी ५४ ग्रामस्थांना अटक करुन ग्रामस्थांवर पोलिसांच्या खूनाच्या प्रयत्नाचा गून्हा दाखल केलाय. अवैध धंद्याची तक्रार करण्या-या बचत गटाच्या महिलांनाही कोठडीत डांबलं आहे.या बाचाबाचीत ३ पोलीस जखमी झाले आहेत. प्रकरण चिघळण्याची शक्यता दिसताच. प्रसार माध्यांना ग्रामस्थांना भेटण्यास मज्जाव केला जावू लागलाय.. कनगरा गावातल्या महिला एक वर्षापासून गावातली दारु बंद करण्याची मागणी करत होत्या..शेवठी स्वत पुढाकार घेवून दारु बंदीचा प्रयत्न केल्याची गावाला अशी शिक्षा मिळाली.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.