राज-उद्धव एकत्र आल्यावर पोटात का दुखतं- बाळासाहेब

राज आणि उद्धव एकत्र आल्यावर इतरांच्या पोटात का दुखतं असं बाळासाहेबांनी म्हंटलं असतानाच, दुसरीकडे राजकारण हे राजकारणाच्या जागी आणि कुटुंब हे कुटुंबाच्या जागी असतं, असं राज ठाकरेंनीही म्हंटलंय

Updated: Sep 8, 2012, 08:35 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज आणि उद्धव एकत्र आल्यावर इतरांच्या पोटात का दुखतं असं बाळासाहेबांनी म्हंटलं असतानाच, दुसरीकडे राजकारण हे राजकारणाच्या जागी आणि कुटुंब हे कुटुंबाच्या जागी असतं, असं राज ठाकरेंनीही म्हंटलंय
‘ज्या माणसानं मला अंगाखांद्यावर खेळलो... ज्यांनी वाढवलं... ज्यांनी संस्कार केले... कसं वाटणार त्यांना भेटून...? नक्कीच खूप आनंद झाला होता तेव्हा. पण, तेव्हाचा प्रसंग वेगळा होता. असं राज ठाकरे यांनी देखील भावना व्यक्त केल्या होत्या.
बाळासाहेबांकडून काही राजकीय सल्ला मिळण्याचा किंवा देण्याचा, ही काही राजकीय सल्ला देण्याची ही काही जागा, परिस्थिती आणि वेळही नव्हती.’ असं म्हणतं राज ठाकरे यांनी `झी २४ तास`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्या भावना व्यक्त केल्या.