`संकट आहे, मात्र बाळासाहेब नक्कीच मार्ग काढतील`

शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृतीविषयी साऱ्यांनाच चिंता वाटत असल्याने अनेकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेत आहेत.

Updated: Nov 15, 2012, 01:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृतीविषयी साऱ्यांनाच चिंता वाटत असल्याने अनेकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेत आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर, राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काँग्रेस नेते यांनी बाळासाहेबांची भेट घेतली, तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.
`संकट आहे, मात्र बाळासाहेब त्यातून नक्कीच मार्ग काढतील` असा उद्धव ठाकरेंना विश्वास असल्याचे हुसैन दलवाई यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शरद पवार, राज ठाकरे `मातोश्री`वर दाखल झाले आहेत.
तर `मातोश्री`बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उद्योग, कलाक्षेत्रातले दिग्गज यांनी देखील मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.