अंत्यसंस्कार पाहताना झाला`मृत्यू`

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या निधनाने अनेकजण हळहळले, बाळासाहेबांच्या निधनाने मात्र वसईत विचित्र घटना घडली. बाळासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार टीव्हीवरून पाहता पाहता हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली.

Updated: Nov 20, 2012, 12:02 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या निधनाने अनेकजण हळहळले, बाळासाहेबांच्या निधनाने मात्र वसईत विचित्र घटना घडली. बाळासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार टीव्हीवरून पाहता पाहता हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली. मधुकर गोपाळ दळवी ( वय ८४ ) असे त्यांचे नाव असून ते पूर्वी अनेक वर्ष मुंबई दादर येथे तर गेली ४ वर्ष विरार पूर्वेला राहत होते. मराठी अभिनेते चेतन दळवी यांचे ते वडील होत .
रविवारी सकाळपासून मधुकर दळवी आपल्या घरी बसून टीव्हीवर बाळासाहेबांची अखेरची महायात्रा पाहत होते . सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांना टीव्ही पाहतानाच अचानक हार्टअटॅक आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला . सोमवारी सकाळी विरार पश्चिमेच्या वैकुंठ स्मशानभूमीत मधुकर दळवी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळेस वसईचे महापौर राजीव पाटील , माजी नगरसेवक संजय पिंगुळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते .
रेल्वेमध्ये सिनियर अकाउंटंट असलेले मधुकर दळवी हे मूळचे सिंधुदुर्गच्या सावंतवाडी , उपवंडे गावातील . दादर पोर्तुगीज चर्च भागात ते गेले अनेक वर्ष राहिले . तेथील घर सोडून विरार पूर्व , नारिंगी येथील परांजपे कॉलनीत ते ४ वर्षांपासून राहण्यास आले होते .