www.24taas.com, मुंबई
शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराची जागा तातडीनं सोडण्याची नोटीस महापालिकेनं बजावलीय. आता शिवेसना ही जागा सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याआधीच शिवाजी पार्कमध्ये स्मारक होणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे म्हणणे नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याने या नोटीसीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेचे महापौर आणि शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेनं कोर्टात कॅव्हेट दाखल केले असून या कॅव्हेटमध्येच महापालिकेनं जागा सोडण्याबाबतचे निर्देश नमूद केले आहेत. त्यामुळे महापौर आणि खासदार राऊत या नोटीशीला उत्तर देणाऱ का, याची उत्सुकता लागली आहे.
अपवादात्मक परिस्थितीत केवळ एका दिवसासाठी बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कवरील १०० चौरस फुटांची जागा देण्यात आली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेनं ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता ही नोटीस बजावण्यात आली आहे.