राणेही रडले, `साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही,

`साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहिल`... असं म्हणत माजी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं.

Updated: Nov 17, 2012, 08:00 PM IST

www.24taas.com, मुंबई
`साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहील...` असं म्हणत माजी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं. नारायण राणेंनी `झी २४ तास`कडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मला नगरसेवक ते मुख्यमंत्री या पदापर्यंत साहेबांच्या आणि फक्त साहेबांच्याच कृपेने पोहचलो, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
'मी आज जे काही घडलो... ते फक्त साहेबांमुळेच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. साहेब गेल्याचं दु:ख प्रचंड आहे. मराठी माणसासाठी लढणारा नेता आजवर पाहिला नाही. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्यासाठी बाळासाहेबांनीच शिकवलं' या शब्दात नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
साहेब आज गेल्याने सगळीकडे शोककळा पसरली. साहेबांनी आपल्या कर्तृ्त्वाच्या जोरावर सत्ता असो वा नसो पण ते स्वाभिमानाने आणि रूबाबदारपणे जगले. त्यांनी प्रत्येकाशी प्रेमाचे संबंध जोडले. माणुसकीचा अर्क म्हणजे बाळासाहेब. माझ्या डोळ्यातून आज अश्रू थांबत नाहीये... उद्धव आणि राज यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देऊ नये. मी यापुढे काही बोलू शकणार नाही, असं म्हणताना राणेंचे अश्रू वाहत राहिले...