मुलीच्या लग्नातील अडचणी, करा हे उपाय

ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर ज्योतिषशास्त्रात काही तोडगे तसेच काही विधी सांगितले आहेत.

Updated: Mar 27, 2013, 09:19 AM IST

www.24taas.com
ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर ज्योतिषशास्त्रात काही तोडगे तसेच काही विधी सांगितले आहेत. ते विधी आपल्या कन्येच्या हातून केल्यास तिच्या विवाहातील अडचणी दूर होतील. महिन्याच्या शुध्द चतुर्थीला चांदीच्या छोट्या वाटीत गायीचे दूध घेऊन त्यात साखर व भात घ्या.
चंद्रोदयाच्या वेळी त्यात तुळशीचे पान ठेवून नैवेद्य दाखवा आणि स्वत:भोवती प्रदक्षिणा घाला. 45 दिवस असे केल्यानंतर एका कुमारीकेला भोजन देऊन तिला कपडे, मेंदी दान म्हणून द्यावे. हे व्रत नियमित पूर्ण केल्यास सुयोग्य वराची प्राप्ती होऊन लवकरच विवाह होतो.
आठवड्यात गुरूवारी सकाळच्या प्रहरी प्रात:विधी आटोपून पीठामध्ये किंचित हळद मिसळून किमान पाच पोळ्या तयार कराव्यात. प्रत्येक पोळीवर गुळ ठेवावा व गायीला खाऊ घालाव्या. 7 गुरूवार हा विधी नियमित केल्याने तत्काळ विवाह जुळतात.