नवी दिल्ली : ज्याप्रमाण हिंदू धर्मात कुबेरला धनवृद्धिचे प्रतीक मानले जाते त्याप्रमाण चीनमध्ये लाफिंग बुद्धाला शुभ आणि धन समृद्धिचे प्रतीक मानले जाते. यामुळेच अनेकांच्या घराच लाफिंग बुद्धा असतो. मात्र हा लाफिंग बुद्धा कुठे ठेवावा याबाबतही माहिती असणे गरजेचे असते.
घरातील पूर्व दिशेला कुटुंबाचे भाग्य आणि सुख शांतीचे स्थान मानले जाते. घरात वातावरण खेळीमेळीचे राहण्यासाठी पूर्व दिशेला दोन्ही हात वर केलेला लाफिंग बुद्धा ठेवावा.
फेंगशुईच्या नियमानुसार लाफिंग बुद्धा घरातील दक्षिण पूर्व दिशेला ठेवल्यास या ठिकाणी सकारात्मक उर्जा वाढते. धनवृद्धि होते.
लाफिंग बुद्धा जर तुम्ही कामाच्या ठिकाणी ठेवत असाल तर डोळ्यासमोर दिसेल इतक्या उंचीवर ठेवावा. यामुळे प्रवेश केल्याक्षणी तुमची नजर त्याच्यावर पडेल.
ज्याप्रमाण गणेशाचे मुख दरवाजाच्या दिशेने असणे शुभ असते त्याप्रमाणे लाफिंग बुद्धाही दरवाजाच्या मुख्य ठिकाणी ठेवणेही शुभ मानले जाते.