मुंबई: आज २७ ऑक्टोबर शरदपौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री लक्ष्मी माता आपल्या भक्तांना शोधते. यादरम्यान जे गरीब लोकं देवीला मिळतात त्यांचं दारिद्र्य देवी दूर करते अशी मान्यता आहे.
आणखी वाचा - अचानक धन पाहिजे तर लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नाव घ्या
शारदीय पौर्णिमेची रात्र दिवाळी पेक्षाही महत्त्वाची आहे, कारण या रात्री स्वत: लक्ष्मी भक्तांना शोधते. आजच्या दिवशी हे काही उपाय केल्यानं धन प्राप्त होतं, असं वैदिक शास्त्रात सांगितलंय.
पाहा कोणते हे उपाय -
१. शंखावर केशरानं स्वस्तिक बनवा, १०८ अक्षता घ्या आणि एक-एक अक्षत महालक्ष्मी मंत्र वाचून शंखावर वाहा... नंतर त्या अक्षता लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये ठेवा.
त्यासाठीचा मंत्र - ओम श्रीं ओम , ओम ह्रीं ओम महालक्ष्मये नम :
तांदूळ चंद्राचं प्रतिक आहे आणि शंख लक्ष्मीचं स्वरूप... हा उपाय आज रात्री ९ वाजल्यापासून मध्यरात्री १२.३० पर्यंत करू शकता.
२. घरात लक्ष्मीच्या स्थायी निवासासाठी पौर्णिमेच्या संध्याकाळपासून उद्यासकाळपर्यंत अखंड दीप तेवत ठेवा. चंद्रलोकात लक्ष्मी देवी दीप स्वरूपात विराजमान आहे. अखंड दीपाच्या प्रकाशानं देवी धावत येईल.
३. लक्ष्मीच्या तांत्रिक उपायात आपण छोट्या नारळाची पूजा करून त्याची स्थापना देवघरात करा. अष्ट लक्ष्मीवर ९ कमळाची फुलं महालक्ष्मीचं अष्टक म्हणा... लक्ष्मी गरीबांच्या आयुष्यात प्रवेश करेल.
४. दक्षिणावर्ती शंखाद्वारे लक्ष्मी मातेला अभिषेक करा आणि धूप, दीप, फुलानं पूजा करावी. दक्षिणावर्ती शंख पौर्णिमेच्या दिवशीच प्रकट झाला होता. श्रीसूक्तचा पाठ करूनही धनप्राप्ती होते.
5. पौर्णिमेला लक्ष्मी सहस्त्रनाम, लक्ष्मी अष्टावली, सिद्धिलक्ष्मी कवच, श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त, महालक्ष्मी कवच, कनकधारा यासारखे पाठ केल्यानं लक्ष्मीची कृपा होईल.
6. पौर्णिमेला आवळ्याची पूजा केल्यानंही लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. शरदाच्या चांदण्या रात्री आवळ्यातील औषधी गुण अधिक वाढतात.
7. शरद पौर्णिमेला महालक्ष्मीला खीर, मेव्याच्या खीरचा नैवेद्य दाखवावा. गायीच्या दूधात महालक्ष्मीचा वास आहे, म्हणून ही खीर लक्ष्मीला खूप प्रिय आहे.
जर 27 ऑक्टोबरला दिवाळीपर्यंत लक्ष्मी मातानं स्वत: आपल्या घरात प्रवेश करावा असं वाटत असेल. तर या उपायांनी देवीला आमंत्रित करावं.
आणखी वाचा - पैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.