तिकिट दरवाढ आणि आरक्षणावर जादा पैसे

रेल्वे बजेटमध्ये आरक्षण दरात, सेकंड क्लाससाठी कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, सुपरफास्ट गाड्यांच्या सेकंड आणि स्लीपरसाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. तर आरक्षण करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 26, 2013, 04:53 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
रेल्वे बजेटमध्ये आरक्षण दरात, सेकंड क्लाससाठी कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, सुपरफास्ट गाड्यांच्या सेकंड आणि स्लीपरसाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. तर आरक्षण करताना साजा पैसे मोजावे लागणार आहेत.

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर जोरदार टीका होत आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने तीव्र विरोध केलाय.

सुपरफास्ट दर वाढ
सुपर फास्टसाठी ५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर स्लीपर क्लाससाठी ही वाढ १० रूपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे तिकिटासाठी जादा पैसे छुप्या पद्धतीने वसूल करण्यात आलेत.
- सेकंड क्लास - ५ रूपयांची वाढ
- स्लीपर - १० रूपयांची वाढ
- एसी चेअर कार - १५ रूपयांची वाढ
- एसी इकॉनॉमी - १५ रूपयांची वाढ
- एसी थ्री टीअर – १५ रूपयांची वाढ
- फस्ट क्लास - १५ रूपयांची वाढ
- एसी सेकंड क्लास - १५ रूपयांची वाढ
- एसी फस्ट - २५ रूपयांची वाढ
- एक्झिक्युटीव्ह - २५ रूपयांची वाढ
आरक्षण दर वाढ
- सेकंड क्लास - आरक्षण दरात वाढ नाही
- स्लीपर - आरक्षण दरात वाढ नाही
- एसी चेअर कार - आरक्षण दरात १५ रूपयांची वाढ
- एसी इकॉनॉमी - आरक्षण दरात १५ रूपयांची वाढ
- एसी थ्री टीअर - आरक्षण दरात १५ रूपयांची वाढ
- फस्ट क्लास - आरक्षण दरात २५ रूपयांची वाढ
- एसी टू - आरक्षण दरात २५ रूपयांची वाढ
- एसी फस्ट - आरक्षण दरात २५ रूपयांची वाढ
- एक्झिक्युटीव्ह - आरक्षण दरात २५ रूपयांची वाढ