अजित पवारांच्या रडारावर पोलीस

पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर दुसरं तिसरं कोणी नव्हे तर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यात पालिका निवडणुकीनंतर गुंडगिरी वाढली होती. या गुंडगिरीने पुण्याचे नाव बदनाम झाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण झाला आहे.

Feb 24, 2012, 09:14 PM IST

पवार देणार का, मोहिनी लांडे यांना संधी

पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदाच्या शर्यतीत आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्याचबरोबर अनेक अनुभवी नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे. मात्र, नेते अजित पवार मोहिनी लांडे यांना संधी देतील का, याचीच चर्चा आहे.

Feb 23, 2012, 03:49 PM IST

पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाल्यावर आता शहरात महापौर कोण याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्याचबरोबर अनेक अनुभवी नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे.

Feb 22, 2012, 07:27 PM IST

पवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव

शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला.

Feb 11, 2012, 11:56 AM IST

अजित पवार-पृथ्वीराज चव्हाणांचा कलगीतुरा

पुण्यात काँग्रेसचा स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनाच नाहीय. त्यामुळे त्यांनी निवडणुकीआधीच आघाडीची भाषा सुरू केलीय. पण त्याचबरोबर अर्थखातं कुणाच्याही ताब्यात असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काहीच होत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगवाला आहे.

Feb 10, 2012, 05:45 PM IST

पुण्यात राज ठाकरे, अजित पवार यांचा 'रोड शो'

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये रोड शो करणार असल्यामध्ये पुण्यातल्या रस्त्यांवर आज रोड शोंचा धमाका आहे.

Feb 8, 2012, 12:12 PM IST

आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Feb 8, 2012, 11:43 AM IST

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

पुणे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय.

Feb 7, 2012, 08:54 PM IST

नितेश राणेंचा अजितदादांना इशारा

द्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि 'स्वाभिमान' संघटनेचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यास तयार राहावे असा इशारा नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Feb 4, 2012, 05:25 PM IST

टीका करताना दमानं, पवारांचा सबुरीचा सल्ला!

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे विरुद्ध अजित पवार आणि आर. आर. पाटील या जुगलबंदीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभांमधून बोलताना संयम पाळावा तसंच वैयक्तिक टीका करु नये, असा सल्ला शरद पवारांनी आर. आर. पाटील आणि अजित पवारांना दिला आहे.

Feb 3, 2012, 11:13 PM IST

राणेंचे वस्त्रहरण आणि घडामोडी...

नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगलंय. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.

Feb 2, 2012, 08:45 AM IST

राष्ट्रवादीचा राणेंवर 'हल्लाबोल'

कोकणात नारायण राणेंनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण केल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणेंवर आज एकमुखी हल्ला चढवला. सर्वांवरच राणेंनी टीकेचे प्रहार केल्यानं राष्ट्रवादीनं आज राणेंवर हल्लाबोल केला.

Feb 1, 2012, 08:28 PM IST

अजित पवारांचा नारायण राणेंवर पलटवार

उद्योगमंत्री नारायण राणेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे ते अहमदनगर इथे बोलत होते. नारायण राणेंचे मानसिक संतूलन बिघाडल्याने ते असे बोलतात अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली.

Feb 1, 2012, 04:08 PM IST

जिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल

मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Jan 27, 2012, 10:11 PM IST

...आणि अजित पवार भडकले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघडणी केलीये. राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी आपल्या समर्थक आणि नातेवाईकांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावल्यानं अजित पवार नाराज झालेत.

Jan 25, 2012, 09:00 AM IST

काकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे

आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे, मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.

Jan 19, 2012, 04:11 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जातप्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.

Jan 18, 2012, 09:57 AM IST

अजित दादांच्या वर्चस्वाला सुरूंगाची शक्यता?

पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला...जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सज्ज झालेत. तर युतीनं पवारांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसलीय.

Jan 16, 2012, 07:55 PM IST

अजितदादा विरुद्ध पतंगराव सामना रंगणार?

पिंपरी-चिचवड महापालिकेत अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगण्याची चिन्हं होती. मात्र काँग्रेसनं अचानक पतंगराव कदम यांना पुढं केलय. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी लढायचं टाळलं की त्यांना हटवण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे.

Jan 13, 2012, 05:11 PM IST

पुतण्यांकडून 'खुलासा', काकांना 'ग्रीन सिग्नल'

शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाईची शक्यता असतानाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्याला निवडणूक आयोगानं ग्रीन सिग्नल दिला आहे.

Jan 13, 2012, 05:10 PM IST