www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी आपल्या समर्थक आणि नातेवाईकांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावल्यानं अजित पवार नाराज झालेत.
इच्छुकांच्या यादीत नेत्यांच्या समर्थकांचीच नावं असल्यानं अजित पवार नेत्यांवर चांगलेच उखडलेत. निवड समितीच्या सदस्यांनी आपल्या समर्थकांना प्रभागांमध्ये पक्षांतर्गत संपर्क उरणार नाही, अशी व्यवस्था केल्यानं अजित पवार चांगलेच भ़डकलेत. पक्षाचा ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळणे आवश्यक होते. तसे न झाल्याने नेत्यांनी आपल्या समर्थक आणि नातेवाईकांच्या तिकीटासाठी खटाटोप होत असल्याने हे पक्ष वाढीसाठी मारक असल्याचे पवार यांनी म्हटल्याची चर्चा आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असा दम भरल्याचे काही नेत्यांना समर्थक आणि नातेवाईकांना उमेदवारी मिळण्याची आशा नसल्याची कुजकुजबूजही आहे.
पक्ष वाढीसाठी अजित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनाच टार्गेट केले. त्यांचा पुतण्या धनंजय याला पक्षाच्या व्यासपीठावर बसवून आणि ज्येष्ठ बंधु पंडितअण्णा यांना पक्षात घेऊन राजकारणात खळवळ उडवून दिली. आक्रमक धोरण स्वीकारून पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देत असताना नेतेमंडळी निवड समितीच्या सदस्यांनी आपल्या समर्थकांना प्रभागांमध्ये पक्षांतर्गत संपर्क उरणार नाही, अशी व्यवस्था केल्यानं अजित पवार चांगलेच भ़डकलेत.
राष्ट्रवादीचे राज्यातील प्रबळ पुतणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितअण्णा मुंडे, कोकणातील माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी खासदार उत्तमराव पाटील या भाजप, कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीत घेऊन अनेक राजकीय चौकार मारले; तर काका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील सेनेचे खासदार आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीत घेऊन एकच षटकार मारला. त्यामुळे भाजप-कॉंग्रेस-सेनेत एकच खळबळ उडाली असून, अनेक नेत्यांनी पवार काका-पुतण्याची धास्ती घेण्यास भाग पाडले असताना राष्ट्रवादीच्यामुळावर य़ेणाऱ्यांना चाप लावण्याचे काम आता पवार कण्याची शक्यता आहे.