सचिनने घेतली ठाकरे कुटुंबीयांची भेट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काल रात्री मातोश्रीवर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सचिनला बाळासाहेबांचे दर्शन घ्यायचे होते. मात्र, तो येवू शकला नाही.

Nov 20, 2012, 11:35 AM IST

फेसबुक पोस्ट : तोडफोड प्रकरणी ११ जणांना अटक

पालघरमधल्या धाडा हॉस्पिटलच्या तोडफोडप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आलीये. बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या बंदबाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट पोस्ट केली होती. तर दुस-या एका तरुणीनं त्या पोस्टला लाईक केलं होतं. या प्रकरणी ही तोडफोड कऱण्यात आली होती.

Nov 20, 2012, 11:11 AM IST

घ्या बाळासाहेबांच्या अस्थींचे अंतिम दर्शन...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन गंगा, गोदावरी या पवित्र नद्या तसेच हरिहरेश्‍वर वगैरे पवित्र ठिकाणी करण्यात येणार आहे.

Nov 20, 2012, 10:12 AM IST

उद्धव यांच्या हातीच सेनेची धुरा- जोशी सर

बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे संपूर्ण काम आता उद्धव ठाकरे हातात घेतील असा विश्वास शिवसेना नेते मनोहर जोशींनी व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे पक्षकामात स्वतःला झोकून पक्ष वाढवतील, पक्ष पुढे नेतील असंही मनोहर जोशींनी सांगितलं.

Nov 19, 2012, 07:26 PM IST

फेसबुकवर बंदची पोस्ट, दोन मुलींना अटक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उत्सफुर्त मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदची काय गरज होती, असा सवाल फेसबुकवर विचारणा-या आणि या पोस्टला लाइक करणा-या अशी दोन मुलींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Nov 19, 2012, 07:05 PM IST

सातासमुद्रपार बाळासाहेब...

बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता. बाळासाहेबांच्या निधनाची देशभरातील नाही तर जगभरातील मीडियाने दखल घेतली. श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अमेरिका या देशातील प्रसारमाध्यमांनी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले.

Nov 19, 2012, 06:33 PM IST

अस्थिकलश घेतांना उद्धव यांना झाले अश्रू अनावर

बाळासाहेबांच्या अस्थीकलशासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजीपार्कवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेतेही उपस्थित होते.. आजही उद्धव ठाकरेंना अश्रू अनावर झाले

Nov 19, 2012, 06:28 PM IST

क्रिकेटपटूंचा निषेध का करू नये?

बाळासाहेब हे जसे राजकारणी होते तसेच ते एक कलाकारही होते. मात्र खेळाडू आणि क्रिकेटपटूंबद्दलही त्यांच्या मनात एक आपुलकी होती. या आपुलकीमुळेच त्यांनी अनेक महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना या ना त्या परीने नेहमीच मदत केली. मात्र त्यांची ही मदत हे खेळाडू आणि क्रिकेटपटू विसरले. या क्रिकेटपटूंचा निषेध का करू नये?

Nov 19, 2012, 05:48 PM IST

बाळासाहेबांच्या अस्थीचे मिळणार सैनिकांना दर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थीकलश राज्यातील जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. याची जबाबदारी संपर्क नेत्यांवर असणार आहे. गावागावांतील शिवसैनिकांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थीकलश ठेवला जाणार आहे. २३ नोव्हेंबरला अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Nov 19, 2012, 04:26 PM IST

बाळासाहेबांचे स्मारक हवे शिवाजी पार्कमध्ये - जोशी

शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांकडून इच्छा आहे.

Nov 19, 2012, 02:03 PM IST

बाळासाहेबांना श्रद्धांजली : मुंबईत स्वयंस्फूर्तीने बंद

बाळासाहेब ठाकरे यांना मूक श्रद्धांजली अर्पण कण्यासाठी मुंबईत आज सोमवारी स्वयंस्फूर्तीने चित्रपट, नाट्य गृह आणि शाळा, महाविद्यालय, सराफा दुकान, कापड दुकाने बंद आहेत तर नवी मुंबईत एफएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत.

Nov 19, 2012, 11:13 AM IST

बाळासाहेबांना न भेटण्याचा पस्तावा - शाहरुख

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर विविध स्तरांतून शोक व्यक्त होतोय. बऱ्याच काळानंतर बॉलिवूड बादशाह शाहरुख खान यानं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपलं मौन सोडलंय.

Nov 18, 2012, 07:52 PM IST

राज ठाकरेंना झाले अश्रू अनावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपले अश्रू अनावर झाले होते. ते अंत्यविधी सुरू असताना ढसाढसा रडत होते.

Nov 18, 2012, 07:36 PM IST

….आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला

बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा, उपचारांना साहेबांचा चांगला प्रतिसाद, शिवसैनिकांच्या प्रार्थनेला यश, सेनाप्रमुखांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडं....अशा अनेक बातम्यांनी उभा महाराष्ट्र काल, परवापर्यंत किंबहूना आज दुपारपर्यंत ढवळून निघाला होता. पण शेवटी ती दुदैवी बातमी आलीच आणि उभ्या महाराष्ट्राच्या अश्रूंचा बांध फुटला..

Nov 18, 2012, 03:50 PM IST

राज ठाकरे चालले पायी!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये समस्त ठाकरे कुटुंबिय सहभागी झाले. परंतु, बाळासाहेबांचे पार्थिव असलेल्या रथामध्ये राज ठाकरे नव्हते. राज ठाकरे यांनी रथाऐवजी रथासमोर पायी चालण्याचा निर्णय घेतला.

Nov 18, 2012, 03:37 PM IST

बाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ....

बाळासाहेब आणि शिवतीर्थ याचं नातं हे जन्मजन्मांतरीचं.... एकच नेता, एकच मैदान... हा नारा देत... बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक... हेच दृष्य म्हणजे बाळासाहेबांची खरी संपत्ती...

Nov 18, 2012, 09:57 AM IST

राज ठाकरेंकडून शिवाजी पार्कची पाहाणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी रात्री उशिरा दादर येथील शिवाजी पार्क आणि परिसराची पाहणी केली. बाळासाहेब यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी पाहाणी केली.

Nov 18, 2012, 08:26 AM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन

हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शनिवारी दुपारी निधन झालंय. मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते. आज (रविवारी) त्यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. शिवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कवरच बाळासाहेब ठाकरे यांचं अंत्यदर्शन आणि अंत्यविधी होणार आहे.

Nov 18, 2012, 08:25 AM IST

बच्चन यांची बाळासाहेबांना काव्यांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपश्चात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपले वडील कवी स्व. हरिवंशराय बच्चन यांची एक कविता बाळासाहेबांना अर्पण केली आहे.

Nov 18, 2012, 08:24 AM IST

...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा- बाळासाहेब

बाळासाहेबांचे फटकारे... कसे होते बाळासाहेबांच्या शब्दांचे फटकारे... बाळासाहेब म्हणजे शब्दांचा निखरा... आणि हाच निखारा आता थंड झाला आहे.

Nov 18, 2012, 07:44 AM IST