दीडशे वर्षांची परंपरा, 'चोर गणपती' आले दारा!
श्री. गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय. दीडशे वर्षापासूनची पंरपरा असलेल्या या गणपतीला ‘चोर गणपती’ असं म्हटलं जातं.
चला गणपती गावाकडं चला...
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असल्यानं कोकण गजबजून गेलाय.
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आराम बसला सावर्डे-आगावे जवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात २० जण गंभीर जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मनसेच्या इशाऱ्यानंतर इंग्रजी शाळा नरमल्या!
काँन्वेंट शाळांना गणेशोत्सवाची पाच दिवसांची सुट्टी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलीय. काँन्व्हेंट शाळांना गणेशोत्सवात सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे मनविसे अधिक आक्रमक झाली आहे.
बाप्पाची भक्ती अनोख्या पद्धतीने... काय आहे गणेशाची आराधना?
गणरायाची रुपं जितकी तितके त्याचे भक्तही.. प्रत्येकजण बाप्पाची भक्ती अनोख्या पद्धतीने करतो. तुम्हाला असा अवलिया ओळख करून देत आहोत. मात्र वेळात वेळ काढून ते खास पद्धतीने कशी करतात गणेशाची आराधना.
अबब..जगातली सर्वात मोठी अगरबत्ती
जगातली सर्वात मोठी अगरबत्ती न्यूयॉर्कमध्ये बनवण्यात आलीय.. आतापर्यंत गिनीज बुकातील तब्बल १६३ विक्रम नावावर असलेले अशरीता फरमन आणि त्यांच्या २० मित्रांनी मिळून ही अवाढव्य अगरबत्ती तयार केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी
मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गणेश उत्सवाच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे या मार्गावर जड वाहने चालवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्यांना जादा डबे
गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेच्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वेटींगवर असणाऱ्यांना किमान प्रवास करणे शक्य होणार आहे.
सणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक
सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.
कोळ्यांची मासेमारी, `बाप्पां`ची सागरवारी!
कोळी बांधव आपल्या बोटीवरच गणेशोत्सव साजरा करतात. आणि मग या मच्छिमारांबरोबरच बाप्प्पाचा समुद्र प्रवास सुरु होतो.
डॉल्बीचा नाद, भक्त पोलिसांमध्ये वाद
गणपतीचे आगमन आता आवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादाच निमित्त ठरलंय ते म्हणजे डॉल्बी...
कशी करावी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
गणेशोत्सवाच्या दिवशी स्नान करून सोनं, तांबं किंवा मातीच्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
मुंबईतले बाप्पा `इको फ्रेंडली`!
आता लवकरच गणपतीचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव एका आठवड्यावर आला आहे. यंदा बरीचशी मंडळं इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत. पर्यावरणाचा विचार करत अधिका मंडळे इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत.
विघ्नहर्त्याच्या मूर्तीकामात वरुणदेवाचं `विघ्न`!
सतत कोसळणाऱ्या पावसाने गणेश मूर्तीच्या निर्मितीला अडथळे येत असल्याने नागपूरच्या मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!
अभिनेता सलमान खानच्या वांद्राच्या घरी यंदा गणरायाचं आगमन होणार नाही.गेले ११ वर्ष सलमानची बहीण अर्पिता वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचं स्वागत करायची. मात्र यावर्षी वांद्राच्या घरी रिन्यूवेशन होत असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार पडत नसल्यामुळे येथे गणरायाला आणले जाणार नाही.
यंदा गणपती तयार करा `ऑनलाईन`!
ऑन लाईन शॉपिंग, ऑन लाईन बँकिंग, ऑन लाईन बुकिंग अशा ऑनलाईनच्या जमान्यात आता ऑनलाईन गणपती मेकिंग हा नवा उपक्रम पुण्यात सुरू झालाय.
गणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल
कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.