फिल्म रिव्ह्यू : ‘हॉलीडे’ अक्षयचा ‘मास्टर स्ट्रोक’!

अक्षय कुमार बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याला प्रत्येक कला अवगत आहेत. कॉमेडी असो किंवा अॅक्शन अक्षय दोन्हीत फीट. अक्षय म्हणजे बॉलिवूडमधील फुल फ्लेज्ड एंटरटेनर, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 7, 2014, 10:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अक्षय कुमार बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याला प्रत्येक कला अवगत आहेत. कॉमेडी असो किंवा अॅक्शन अक्षय दोन्हीत फीट. अक्षय म्हणजे बॉलिवूडमधील फुल फ्लेज्ड एंटरटेनर, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं दाखवून धमाल करणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं त्याला माहितीय. शुक्रवारी 6 जूनला अक्षयचा ‘हॉलीडे’ रिलीज झाला. `ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी’, असं या चित्रपटाचत सांगण्यात आलंय.
काय आहे ‘हॉलीडे’त?
या चित्रपटात अक्षयच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. संपूर्ण फिल्म अक्षयनं एकट्यानंच खेचून आणलीय. चित्रपटचा कॅनव्हास अक्षयच्याच पावलावर आणि स्टाईलवर चालतो. चित्रपटातले डॉयलॉग फिल्मचा गाभा आहे. ज्यांना खूप टाळ्या मिळतात...
स्टोरी
चित्रपटात अक्षय कुमारचं नाव विराट आहे, जो की एक भारतीय सैन्याचा जवान आहे. विराट सुट्ट्यांमध्ये घरी येताच त्याचे आई-वडील लग्नासाठी त्याची भेट साहिबा म्हणजेच सोनाक्षी सिन्हा सोबत करवतात.
चित्रपट पुढे सरकतो... लग्न ठरतं... मात्र तेव्हाच विराटला काही दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळते. मग सुरू होतो त्यांचा शोध... यात विराटचा मित्र म्हणजेच सुमित राघवनही त्याची मदत करतो... सुमित चित्रपटात एक पोलीस इंस्पेक्टर आहे. अक्षय (विराट)चं मिशन आता दहशतवाद्यांना मारणं असतं. त्यांना पकडण्यासाठी अक्षय पुढे जातो... आणि नंतर.... !
चित्रपट समिक्षा
मुरुगादॉसचा चित्रपट `हॉलीडे−अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. फिल्मला पेस आहे कधी आपले 2 तास 40 मिनिटं संपतात हे कळतही नाही. चित्रपटातील गाणे मात्र बोरिंग आहेत. जे फिल्मची पटकथा आणि स्पीडवर ब्रेक लावतो. चित्रपटात अक्षय-सोनाक्षीचा रोमांस खटकतो.
काहीही असलं तरी चित्रपट खूप सॉलिड स्पीडमध्ये चालतो आणि एक चांगला पेसी आणि मनोरंजक फिल्म याला आपण म्हणू शकतो. आपण एकदा तरी हा सिनेमा पाहू शकतो. चित्रपटात सोनाक्षी फक्त आयटम म्हणून राहिलीय. कारण चित्रपट पूर्णपणे अक्षयच्या भोवताल फिरतो.
अक्षय कुमारचा चित्रपटातला परफॉर्मन्स एकदम जबरदस्त आहे. सुमित राघवननंही दमदार अॅक्टिंग करत सर्वांची वाहवा मिळवलीय. संपूर्ण फिल्ममध्ये मात्र अक्षयचं अक्षय आहे. त्याच्या फॅन्सला ही चित्रपट नक्की आवडेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.