WWW.24taas.com, मुंबई
बॉलिवुडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन हे उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबरीने ते एक चांगले लेखकही आहेत. ७० वर्षीय अमिताभ बच्चन हे नेहमीच आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच सक्रीय असतात. असे असताना आमिताभ आपल्या मागील आठवणींना नेहमीच उजाळा देत असतात. त्यांच्या लेखनाचे काही पैलू नेहमीच आपल्याला सोशल नेटवर्कींग साइटवर पाहायला मिळतात.
हल्लीच आमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर काही जुन्या आठवणींला उजाळा दिला आहे. तेव्हा त्यांनी अभिनेत्री करिना कपूर हिच्यासोबतचा एक किस्सा लिहिला आहे.
ही गोष्ट आहे १९८३ सालची.... तेव्हा पुकार या चित्रपटाची शुटिंग सुरू होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी चिमुकली करिना सेटवर आली होती. एका सीनमध्ये तिचे वडील रणधीर कपूर यांना खलनायकाच्या हातून मार खात होते. हे पाहून लहान करिना घाबरली आणि आपल्या वडिलांकडे ती अनवाणी पायाने धावत गेली. त्यावेळी तिच्या पायाला माती लागली होती. ती माती मी साफ केल्याच अमिताभ यांनी सांगितले. करिनाला अजूनती गोष्ट आठवते.
करिना कपूर ने “कभी खुशी कभी गम” या सिनेमात आमिताभ बच्चन यांच्या सोबत काम केलं होत आणि आता ती पुन्हा प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमात अमिताभ सोबत दिसणार आहे.
बच्चन आणि कपूर या घराण्यादरम्यान थोडे वाद निर्माण झाले आहेत. ते करिनाची मोठी बहीण करीश्मा सोबत अभिषेकचा साखरपुडा तुटला होता. पण आता असं वाटतय की दोन्ही कुटुंब आपल्यातील वाद मिटवून पुन्हा एकत्र येतील.