close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कॅन्सर टाळण्यासाठी स्तनांवर शस्त्रक्रिया, अॅन्जेलिनाचं धाडसी पाऊल

अँजेलिना जोली या हॉलिवूडच्या प्रसिद्ध नायिकेनं जगभरातल्या स्त्रियांसमोर एक आदर्श घालून दिलाय. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका आहे, हे लक्षात आल्यानंतर तिनं आपले दोन्ही स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 15, 2013, 01:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
अँजेलिना जोली या हॉलिवूडच्या प्रसिद्ध नायिकेनं जगभरातल्या स्त्रियांसमोर एक आदर्श घालून दिलाय. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका आहे, हे लक्षात आल्यानंतर तिनं आपले दोन्ही स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकलेत.
स्तन ही स्त्रीची ओळख, स्तन म्हणजे मातृत्व असं मानणाऱ्या समाजात अँजेलिनानं हे धाडसी पाऊल उचललंय. बीआरसीओ – १ आणि बीआरसीए – २ या गुणसूत्रांमधल्या दोषामुळे ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता बळावते. अँजेलिनामध्ये ही शक्यता तब्बल ८७ टक्के असल्याचं चाचणीनंतर निष्पन्न झालं. त्यानंतर तिनं ‘मास्टेक्टॉमी’ ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
२००७ साली गर्भाशयाच्या कँन्सरमुळे अँन्जेलिनं आपल्या आईला – मार्शलीन ब्रेरट्रांड – गमावलं होतं. ३७ वर्षीय अँन्जेलिनाच्या इलाजाची तीन महिन्यांची प्रक्रिया २७ एप्रिलला संपली.
अनेक चित्रपटांमधून कणखर स्त्रीची भूमिका करणारी आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अँजेलिनानं कॅन्सरचा धोका असलेल्या जगभरातल्या कोट्यवधी स्त्रियांना दिशा दिलीय. जीवनाचं एक वेगळं तत्वज्ञान तिनं जगासमोर ठेवलंय. आता ती खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल स्टार बनली आहे. यामुळे आपलं स्त्रित्व जराही कमी झालेलं नाही, असं ती ताठ मानेनं सांगते.
तिच्या या निर्णयात तिचा साथीदार अभिनेता ब्रॅड पीटची सोबत तिला महत्त्वाची ठरली. सहा मुलांची आई असलेल्या अॅन्जेलिच्या मते, आपल्या मुलांचं भविष्य लक्षात घेऊन तीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पक्का केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.