www.24taas.com , झी मीडिया , मुंबई ,
भाजपचे प्रंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी बॉलिवूडमध्येही आकर्षणचा केंद्रबिंदू ठरले आहेत. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लहरींनी मोदींना पाठिंबा देत भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केलाय.
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्याला जनतेची सेवा करायची असून त्यासाठी भारतीय जनता पक्ष हे उत्तम माध्यम असल्याचं त्यांनी सांगितलंय.
बॉलिवूडच्या सेलिब्रिटी राजकारणात आल्या आणि राजकारणात रमल्या.
भाजपमध्ये रमलेल्या काही सेलिब्रिटी...
स्मृती इराणी ह्या भाजपच्या राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत.
शत्रुघ्न सिन्हा वेळोवेळी भाजपपेक्षा वेगळी मतं प्रदर्षित करतात पण मुरब्बी राजकारण्यांसारखे भाजपमध्ये वावरतात.
राजस्थानाच्या बिकानेरमधून २००४ मध्ये अभिनेता धर्मेंद्र हे भाजपच्याच तिकिटावर निवडून आले होते. ते आता सपत्निक भाजपमध्ये आहेत.
२००६ ते २००९ याकाळात त्यांच्या पत्नी भाजपच्या राज्यसभा सदस्या होत्या. कर्नाटकातून त्यांना राज्यसभेवर भाजपने पाठवले होते. त्यानंतरही हेमामालिनी राजकारणात आहेत भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा या नात्याने प्रचाराची धुरा वाहतील. अशी आशा भाजपला वाटते आहे.
भाजपच्याच तिकीटावर अमृतसर येथून २००४ मध्ये निवडून आलेले नवज्योत सिंग सिद्धू भाजपच्या व्यासपीठावर आपल्या शब्दांनी काँग्रेसला घायाळ करून सोडतात. भाजपची धडाडणारी तोफ असंच त्यांच्या भाषणाचं वर्णन करावं लागेल.
सुपरस्टार विनोद खन्ना भाजपच्या तिकीटावर १९९९ मध्ये पंजाबच्या गुरूदासपूर येथून निवडून आले होते. जुलै २००२ मध्ये भाजपने त्याना सांस्कृतीक मंत्रीपद बहाल केलं होत.
नितीश कुमारच्या विरूध्द बिहार मध्ये भाजपच्या कीर्ती आझाद यांनी उघडपणे समोर येतात ते भाजपच्या तिकिटावर बिहारच्या दरभंगा येथून खासदार आहेत.
कधी सलमान मोदींना गुडमन म्हणतो. कधी लतादीदीना मोदी प्रधानमंत्रीपदी विराजमान व्हावेत, असं वाटतं तर कधी सचीनच्या साराला मोदी प्रधानंमत्री व्हावेसे वाटतात.
त्यामुळे भाजप आणि बॉलिवूड एकमेकांच्या प्रेमात पडल्यासारखे वाटतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.