दीपिकानं रणवीरसोबत न्यूयॉर्कमध्ये साजरा केला वाढदिवस

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दीपिका पादुकोणनं नुकताच आपला २८वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे यंदाचा तिचा वाढदिवस खूपच खास ठरला कारण तिच्यासोबत होता अभिनेता रणवीर सिंह... ते ही न्यूयॉर्कमध्ये...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 7, 2014, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दीपिका पादुकोणनं नुकताच आपला २८वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे यंदाचा तिचा वाढदिवस खूपच खास ठरला कारण तिच्यासोबत होता अभिनेता रणवीर सिंह... ते ही न्यूयॉर्कमध्ये...
नुकताच दीपिका-रणवीरचा ‘राम-लीला’ रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी या दोघांच्या ऑनस्क्रीन केमेस्ट्रीची खूप स्तुतीही केली. आजकाल हे खूप दोघं डेटिंग करतांना दिसत असल्याची चर्चा आहे. मात्र दोघांनीही या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलंय.
दीपिका-रणवीर त्यांच्या या नात्याबद्दल काही बोलत नसले तरी ५ जानेवारीला न्यूयॉर्कच्या चेल्सी मार्केटमध्ये दीपिकाच्या वाढदिवशी हे दोघं एकत्र दिसले. दोघंही एकांतात फिरत असल्याचं त्यांना वाटत असलं तरी ते फॅन्सच्या नजरेतून सुटू शकले नाहीत.
न्यूयॉर्क सिटी रेस्टॉरेंटमध्ये एका फॅननं या दोघांचा फोटो काढला आणि तो ट्विटरवर शेअर करत लिहिलं... `Ranveer Singh is such a sweet heart. Deepika got mad cuz people were surrounding her too much lol`.
दीपिका-रणवीरच्या या लीलेतून लवकरच नवा रंग बघायला मिळेल हेच यावरुन दिसून येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.