www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमिर खानच्या ‘धूम-३’नं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमधडाका उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच सिनेमांचे कमाईचे रेकॉर्ड उधळून लावलेत. रिलीज झाल्यानंतर केवळ १७ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५०२ करोड रुपयांचं ग्रॉस कलेक्शन या सिनेमानं केलंय. हा खरं तर हिंदी सिनेसृष्टीवर आणि बॉक्स ऑफिस एक इतिहासच रचालाय.
सोमवारी संध्याकाळी उशीरा यश राज फिल्म्सच्या प्रवक्त्यांनं ‘धूम-३’ची ही यशाची चढाई जाहीर केलीय. ‘धूम-३’नं भारतामध्ये ३५२ कोटी आणि भारताबाहेर १५१ करोड रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलंय, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
बॉक्स ऑफीसवर ५०० कोटींचा टप्पा गाठतानाच ‘धूम-३’ भारतीय इतिहासातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. सिनेमाच्या या रेकॉर्डतोड कमाईनंतर आता या सिनेमाला जर्मनी, पेरू, रोमानिया, जापान, रशिया आणि तुर्कीमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी तिकीट खिडकीवर सगळ्यात जास्त कमाई करणारे ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘क्रिश-३’ या सिनेमांना ‘धूम-३’नं कधीच मागे टाकलंय. आता हा सिनेमा ७०० करोडपर्यंत पोहचून या यशाला कळसही चढवू शकेल, असं अनेकांना वाटतंय. २० डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.