www.24taas.com, नवी दिल्ली
काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयानं सलमानला तूर्तास दिलासा दिला असला तरी त्याच्यापुढील अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. आता कोर्टात सादर केलेलं मेडिकल सर्टिफिकेट सलमानला गोत्यात आणू शकतं.
या खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली या सुनावणीला सलमान गैरहजर राहिला होता. यावेळी सलमाननं वैद्यकीय कारण पुढे करत मेडिकल सर्टिफिकेट न्यायालयात सादर केलं होतं. उपचारासाठी अमेरिकेत गेल्याचं त्यांनं सुनावणीच्या वेळी वकिलांमार्फत सांगितले होतं. ही बाब मान्य करुन न्यायालयाने सलमानला प्रत्ययक्ष हजर न राहण्याची मुभाही दिली. परंतू हेच मेडिकल सर्टिफिकेट सलमान खानला गोत्यात आणू शकतं. कारण, सलमानकडून सादर करण्यात आलेल्या या मेडिकल सर्टिफिकेटची सत्यता पडताळून पाहावी, अशी मागणी राजस्थाननच्या बिश्नोई समाजानं केलीय. हे सर्टिफिकेट खोटं असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
`सलमान आजारी असून १० दिवस प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं प्रमाणपत्रात म्हटलं होतं. परंतू, सुनावणीच्या दुसऱ्याच दिवशी विमानानं अमेरिकेतून भारतात परतला... परंतू तो गुरुवारी सुनावणीच्या वेळी मात्र गैरहजर होता’ असं म्हणत या मेडिकल सर्टिफिकेटची सत्यता पडताळून पाहण्याची मागणी बिश्नोई समाजानं केलीय.