आयफा : अॅन्ड दी अॅवॉर्ड गोज टू...

चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार. २०१३ च्या पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आलीय. यावर्षीच या चौद्याव्या पुरस्कार सोहळ्यात बर्फी या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवत बाजी मारलीय

Updated: Jul 7, 2013, 01:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मकाऊ
चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार. नुकतीच, आयफा २०१३ च्या पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आलीय. यावर्षीच या चौद्याव्या पुरस्कार सोहळ्यात 'बर्फी' या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार मिळवत बाजी मारलीय. बर्फीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट यांसोबतच अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
अभिनेता रणबीर कपूर याला 'बर्फी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'कहानी'साठी अभिनेत्री विद्या बालन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच अन्नू कपूर यांना विकी डोनर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार विजेते
बेस्ट अॅक्टर : रणबीर कपूर (बर्फी)
बेस्ट अॅक्ट्रेस : विद्या बालन (कहानी)
बेस्ट फिल्म : बर्फी
बेस्ट डायरेक्टर : अनुराग बसू (बर्फी)
बेस्ट सपोर्टिंग मेल : अनु कपूर (विकी डोनर)
बेस्ट सपोर्टिंग फिमेल : अनुष्का शर्मा (जब तक है जान)
बेस्ट डेब्यू फिमेल: यामी गौतम (विकी डोनर)
बेस्ट डेब्यू मेल : आयुष्यमान खुराना (विकी डोनर)
बेस्ट एक्टर इन कॉमिक रोल : अभिषेक बच्चन (बोल बच्चन बोल)
बेस्ट एक्टर इन निगेटिव्ह रोल : ऋषि कपूर (अग्निपथ)
स्टार जोड़ी ऑफ द इअर : दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर
बेस्ट डेब्यू डायरेक्टर : गौरी शिंदे (इंग्लिश विंग्लिश)
बेस्ट म्युझिक डायरेक्टर : प्रीतम (बर्फी)
बेस्ट लिरिक्स : अमिताभ भट्टाचार्य (अग्निपथ-मुझमें कहीं बाकी)
बेस्ट सिंगर मेल : सोनू निगम (अग्निपथ)
बेस्ट सिंगर फीमेल : श्रेया घोषाल (अग्निपथ-चिकनी चमेली)
स्पेशल अवॉर्ड्स : आईफा फॉरएवर: यश चोप्रा
इंडियन इंटरनेशनल सिनेमा आउटस्टँडिंग अचिव्हमेंट : अनुपम खेर
आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्यूशन टू इंडियन सिनेमा : जावेद अख्तर
ह्यूमॅनिटी अवॉर्ड : शबाना आझमी
डिजिटल स्टार ऑफ दि इअर : शाहरूख खान
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.