८ महिन्यापूर्वीही जियाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

गळफास लावून आत्महत्या केलेल्या जिया खानने आठ महिन्यांपूर्वीही आपल्या मनगटाची शीर कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जियाच्या डॉक्टरांनी याबद्दल खुलासा केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 5, 2013, 08:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गळफास लावून आत्महत्या केलेल्या जिया खानने आठ महिन्यांपूर्वीही आपल्या मनगटाची शीर कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जियाच्या डॉक्टरांनी याबद्दल खुलासा केला.
पोलिसांनीही याबाबत माहिती देताना सांगितलं, की ८ महिन्यांपूर्वी जियाने आपल्या मनगटाची शीर कापली होती. त्यावेळी ती पूर्णपणे नशेत होती. तिच्या बेडरूममध्ये नशेच्या काही आयुर्वेदिक गोळ्या आढळून आल्या होत्या. तिचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली तिला फसवत असल्याचं तिला वाटल्यामुळे तिने तेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र जियाची आई रबिया हिने सुरजचा या आत्महत्येशी संबंध नसल्याचं म्हणणं आहे. सुरज आणि जियाचे प्रेमसंबंध होते. पण त्याने फसवल्यामुळे तिने आत्महत्या केली नसल्याचं जियाच्या आईने म्हटलं आहे. मात्र ती गेले काही दिवस ती डिप्रेशनमध्ये असल्याचं तिच्या आईनेही म्हटलं.
गेली ३ वर्षं फिल्म न मिळाल्याबद्दल जिया अस्वस्थ असल्याचं सुरज पांचोलीचं म्हणणं आहे. ८ महिन्यांपूर्वी तिने याच कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता.जिया खानने दुशऱ्या प्रयत्नात स्वतःचं अस्तित्व कायमचं संपवलं. मात्र तिच्या आत्महत्येचं खरं कारण नेमकं काय, हे कायमच एक गूढ राहाणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.